Join us  

Bride 60 kgs gold : बाबौ! दागिन्यांच्या वजनानं चालणंही मुश्किल केलं; तब्बल ६० किलो सोन्यानं सजली नवरी; पाहा फोटो.....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 11:20 AM

Chinese bride wears 60 kgs gold : असं सांगितले जात आहे की वराचे कुटुंब खूप श्रीमंत आहे.

लग्नात सोन्याचे दागिने घालून मिरवणं यात काही नवीन नाही. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका नवरीनं मात्र तब्बल ६० किलो सोनं अंगावर चढवलेलं दिसून येत आहे. या नववधूचा फोटो नेटिझन्समध्ये तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे ही मुलगी भारतातील नाही तर चीनमधील आहे. चीनमधील हुबेई प्रांतातील या वधूला तिच्या लग्नाच्या दिवशी पाहून सगळेच आश्चर्यचकीत झाले.  

30 सप्टेंबरला लग्नात तिने घातलेल्या जड दागिन्यांमुळे हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हायरल झालेल्या फोटोत वधू हातात पांढरा लग्नाचा ड्रेस आणि हातात गुलाबांचा पुष्पगुच्छ घेताना दिसून आली आहे. दागिन्यांच्या वजनामुळे वधूला जागेवरून हलणंसुद्धा कठीण झालं आणि ती वराची चालण्यासाठी मदत घेत होती. मीडिया रिपोर्टनुसार, हे दागिने वधूला तिच्या पतीने हुंडा म्हणून दिले होते. वराने तिला प्रत्येकी एक किलो वजनाचे 60 सोन्याचे हार दिले.

हाराव्यतिरिक्त तिनं हातात जड बांगड्याही घातल्या आहेत. वराच्या कुटुंबीयांनी तिला बांगड्या भेट दिल्या. असं सांगितले जात आहे की वराचे कुटुंब खूप श्रीमंत आहे. बऱ्याचदा लोक समाजात लोकांना दाखवण्यासाठी दागिने घालतात, पण या वधूची अवस्था पाहून लग्नाला आलेल्या लोकांना दया येत होती. लग्नातील एका पाहुण्याने वधूला मदत केली तेव्हा तिने हसून नकार दिला. ती म्हणाली की ती ठीक आहे आणि लग्नाच्या विधींचे पालन करत राहीली.

स्थानिक लोक सोन्याला 'सौभाग्याचे' प्रतीक मानतात. तिथल्या लोकांसाठी सोने हे वैभव आणि संपत्तीचे लक्षण आहे. लोक वाईट आत्म्यांपासून आणि दुर्दैवापासून मुक्त होण्यासाठी सोन्याचा वापर करतात. वधूचे बरेच हार आणि बांगड्या घातलेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

टॅग्स :सोशल व्हायरललग्न