Join us  

Social Viral : हा असला कसला कंजूसपणा! पैसे वाचवण्यासाठी तिने 23 वर्षे कपडेच धुतले नाहीत, तसेच वापरतेय..

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 6:29 PM

Social Viral : अमेरिकेतील रहिवासी असलेली केट हाशिमोटो नावाची महिला शक्य तितका कमी खर्च करण्याचा प्रयत्न करते.

ठळक मुद्देही महिला पैसे खर्च करावे लागतात म्हणून वैयक्तिक स्वच्छतेकडेही लक्ष देत नाही. या महिलेच्या कंजूसपणाला सीमाच नाही. विशेष म्हणजे घरासाठी लागत असलेल्या वस्तूही केट विकत घेत नाही.

(Image credit -TLC)

सोशल मीडियावर नेहमीच एकापेक्षा एक नमुने व्हायरल होत असतात. पैसे वाचवावेत, जास्त उधळपट्टी करू नये, जिथं गरज असेल तिथंच पैश्यांचा वापर करावा असं अनेकदा तुम्ही ऐकलं असेल. पैसे शिल्लक राहत नाही म्हणून अनेक स्त्रिया काटकसर करून घर चालवतात. पैसे वाचवण्याचं वेड असलेल्या एका महिलेनं मात्र  कमालच केली आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण ही महिला पैसे खर्च करावे लागतात म्हणून वैयक्तिक स्वच्छतेकडेही लक्ष देत नाही. 

पैसे वाचवण्यासाठी ही महिला टॉयलेट पेपर आणि अंत:वस्त्रसुद्धा विकत  घेत नाही. रिपोर्टनुसार ही महिला गेल्या २३ वर्षांपासून एकच अंडरवेअर वापरत आहे. अमेरिकेतील रहिवासी असलेली केट हाशिमोटो नावाची महिला शक्य तितका कमी खर्च करण्याचा प्रयत्न करते. शौचालयाचा वापर केल्यानंतर टॉयलेट पेपर विकत घेण्याऐवजी ती फक्त पाण्याने स्वतःला स्वच्छ करते. 

टीएलसीच्या एक्सट्रीम चीपस्केट्सवर बोलताना ती म्हणाली, ''मी न्यूयॉर्कमध्ये तीन वर्षे राहिले आहे. हे शहर राहण्यासाठी महाग आहे पण मी पैसे बचतीचे काही खास मार्ग निवडलेत. ज्याने मी आपले खर्च कमी करते. जर मला पैसे खर्च करावे लागले तर ते करते पण कमीत कमी खर्च करण्याचा माझा प्रयत्न असतो.'' या महिलेच्या कंजूसपणाला सीमाच नाही. विशेष म्हणजे घरासाठी लागत असलेल्या वस्तूही केट विकत घेत नाही.

रस्त्यावरील भंगारातून फर्नीचरसारख्या वस्तू घेते. तिनं आपला बेड बहुतेक योगा मॅटपासून बनवला आहे आणि डायनिंग टेबलऐवजी ती मॅगजीनच्या बंडलवर जेवण करते. ओव्हननमध्ये ती सामान ठेवते, एका शेल्फप्रमाणे त्याचा वापर करते. तिनं मागच्या आठ वर्षात स्वतःसाठी एकही कपडा घेतला नाही. 

तिनं सांगितलं की, ''१९९८  साली मी अंत:वस्त्र विकत घेतली होती. त्यानंतर एकही कपडा स्वतःसाठी घेतलेला नाही. मी ज्या पाण्यात अंघोळ करते त्याच पाण्यात माझे कपडेसुद्धा धुते. कपडे धुण्यासाठी कोणताही साबण वापरत नाही. शौचालयाच्या वापरानंतर टॉयलेट पेपरही खरेदी वापरत नाही पाणी आणि साबणाने स्वतःला स्वच्छ ठेवते.''  तिच्या म्हणण्यानुसार केटनं आतापर्यंत ५  हजार पाउंड म्हणजे सहा लाखांपेक्षाही जास्त पैसे वाचवले आहेत.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरलअमेरिकाव्हायरल फोटोज्