Join us

‘लाईफ ऑफ वाईफ’ म्हणत स्मृती इराणींनी शेअर केला खास फोटो! नेटिझन्स म्हणाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2022 13:51 IST

Smriti Irani Shared Photo on Social Media : अभिनेत्री, केंद्रिय मंत्री असूनही त्या अतिशय डाऊन टू अर्थ असल्याने त्यांचे नेहमीच कौतुक होताना दिसते.

ठळक मुद्देतुम्ही आमची प्रेरणा आहात असेही अनेकांनी त्यांना या फोटोवर म्हटले आहे. काही तासांत ३० हजारहून अधिक जणांनी तो लाईक केला आहे.

केंद्रिय मंत्री स्मृती इराणीसोशल मीडियावर बऱ्याच अॅक्टीव्ह असतात. इन्स्टाग्रामवर त्या नेहमी काही ना काही अपलोड करत आपल्या चाहत्यांचे लक्ष वेधत असतात. कधी प्रेरणादायी काही पोस्ट करतात तर कधी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही पोस्ट करतात. अभिनेत्री म्हणूनही त्या प्रसिद्ध असल्याने त्यांचे सोशल मीडियावर बरेच फॉलोअर्स आहेत. अभिनेत्री, केंद्रिय मंत्री असूनही त्या अतिशय डाऊन टू अर्थ असल्याने त्यांचे नेहमीच कौतुक होताना दिसते. त्यांच्या साधेपणाबाबतही त्यांचे चाहते त्यांच्यावर खूश असतात (Smriti Irani Shared Photo on Social Media). 

नुकताच त्यांनी आपला एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये त्या एका मॉलमध्ये काहीतरी घरगुती सामानाची खरेदी करताना दिसत आहेत. या पोस्टला कॅप्शन देताना त्या म्हणतात, तुमचे वय वाढते असे तुम्हाला केव्हा वाटते जेव्हा सुट्ट्यांचा आनंद लुटण्याऐवजी तुम्ही घरची कामं करणे पसंत करता. यापुढे लाईफ ऑफ वाईफ असा हॅशटॅग देत त्यांनी काही स्मायलीही पोस्ट केले आहेत. यावेळी त्यांनी कॉटनचा ड्रेस घातला असून त्यावर शॉलसारखी ओढणी पांघरुन घेतली आहे. इतकेच नाही तर त्यांनी काळजी म्हणून चेहऱ्याला मास्कही लावला आहे.   

त्यांचा हा फोटो काही वेळातच असंख्य जणांनी पाहिला असून काही तासांत ३० हजारहून अधिक जणांनी तो लाईक केला आहे. बऱ्याच जणांनी त्यांच्या या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या असून त्यांच्या साधेपणाबाबत त्यांचे कौतुक केले आहे. तुम्ही आमची प्रेरणा आहात असेही अनेकांनी त्यांना या फोटोवर म्हटले आहे. एकता कपूर यावर लिहीते, मास्कमध्येही माझी मैत्रीण छान दिसतीये. काही दिवसांपूर्वीही स्मृती इराणी यांनी ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या असताना लोकरीचे काहीतरी विणत असल्याचा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियास्मृती इराणी