Lokmat Sakhi >Social Viral > लेकीला आईची उणीव भासू नये म्हणून बाबा जेव्हा आई होतो, पाहा दत्तक पित्याची अफाट माया..

लेकीला आईची उणीव भासू नये म्हणून बाबा जेव्हा आई होतो, पाहा दत्तक पित्याची अफाट माया..

Single dad dresses as mom for Mother's Day: Dad dresses as mom for adopted daughter event: Viral single dad Mother's Day event: Adopted daughter Father's Day surprise: Father dresses as mother for daughter: Single dad viral Mother's Day video: Heartwarming viral video single dad: आईच्या रुपात मुलीच्या शाळेत मदर्स डे च्या कार्यक्रमात सहभागी होऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2025 12:34 IST2025-03-26T12:33:00+5:302025-03-26T12:34:17+5:30

Single dad dresses as mom for Mother's Day: Dad dresses as mom for adopted daughter event: Viral single dad Mother's Day event: Adopted daughter Father's Day surprise: Father dresses as mother for daughter: Single dad viral Mother's Day video: Heartwarming viral video single dad: आईच्या रुपात मुलीच्या शाळेत मदर्स डे च्या कार्यक्रमात सहभागी होऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

Single dad dresses up as 'Mom' for Mother's Day event for adopted daughter video viral | लेकीला आईची उणीव भासू नये म्हणून बाबा जेव्हा आई होतो, पाहा दत्तक पित्याची अफाट माया..

लेकीला आईची उणीव भासू नये म्हणून बाबा जेव्हा आई होतो, पाहा दत्तक पित्याची अफाट माया..

आई घराचे मांगल्य असते तर बाबा घराचं अस्तित्व. आईशिवाय घराला घरपण येतं नाही तर बापाशिवाय आयुष्याला मज्जा नाही. (father daughter relation)बाप आणि लेकीच नातं वेगळचं असतं. आपल्याला पहिली मुलगी असावी असं प्रत्येक पित्याला वाटतं असतं. घरात मुलगी जन्माला आली तर तिच्यासाठी काय करु आणि काय नको अशा गोष्टी त्याच्या मनात सुरु असतात. बापाच काळीज लेकीच्या हसण्यात- रडण्यात गुरफटलेलं असतं. (Single dad dresses as mom for Mother's Day)
थायलंडमधील अशी एक हृदयस्पर्शी बाप आणि मुलीची कथा समोर आली आहे. जो लुकफोनबोडी हा त्याच्या मुलीच्या मदर्स डे सेलिब्रेशनचा हिरो बनला.(Dad dresses as mom for adopted daughter event) थायलंडमध्ये मातृदिन हा आनंदाचा दिवस म्हणून साजरा केला जातो.(Adopted daughter Father's Day surprise) परंतु, ज्यांना आई नसते त्यांच्यासाठी ही आठवणीचा दिवस राहातो. आपल्या दत्तक मुलगी नोंग क्रीमला एकटे वाटू नये यासाठी आईच्या भूमिकेत पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. (Viral single dad Mother's Day event)
खरं तर एकट्या पालकांने मुलांचे संगोपन करणे कठीण असते. वेळीच त्यांची आई आणि बाबा बनणं त्याहून कठीण. यामध्ये आई-वडिलांची दुहेरी भूमिका एकाच वेळी सांभाळावी लागते. थायलंडमधील एका वडीलांने मुलीच्या प्रेमावरील नवी व्याख्या मांडली. प्रेमळ हावभावात आणि आईच्या रुपात मुलीच्या शाळेत मदर्स डे च्या कार्यक्रमात सहभागी होऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. 

अंतराळात राहताना सुनिता विल्यम्सचे केस कायम मोकळे का होते? अंतराळवीर केस मोकळे सोडतात कारण..

४८ वर्षाचे प्रचया तदीबू(टोपणनाव) हे शाळेतील हॉलमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांसोबत बसलेले आहेत. मदर्ड डे च्या कार्यक्रमात त्यांनी विग आणि गिंगहॅम ड्रेस घातला. थायलंडमध्ये १२ ऑगस्टला मदर्स डे साजरा केला जातो. ज्यामध्ये विद्यार्थी त्यांच्या आईंना चमेलीच्या फुलांनी आदरांजली वाहतात. जो ची प्रेरणा साधी पण अनेकांच्या मनात घर करुन गेली. ते म्हणतात की, शाळेत जेव्हा मातृदिनाचा कार्यक्रम असतो तेव्हा मला माझ्या मुलांच्या मनात न्यूनगंड नको असतो. मला लाज वाटत नाही कारण मी माझ्या मुलांवर प्रेम करतो. 

त्यांना आईच्या वेशात पाहून त्यांची मुलगी त्यांना प्रेमाने मिठी मारताना दिसत आहे. तसेच मदर्स डे निमित्त त्यांच्या प्रेमासाठी कृतज्ञता देखील व्यक्त करत आहे. त्यांच्या या एका कृतीने समाजात बदल पाहायला मिळाला. या दिनानिमित्त तिने वडिलांवरील प्रेम देखील व्यक्त केले आहे. ते म्हणतात की, मी सिंगल पॅरेंट असून ती माझी सावत्र मुलगी आहे. परंतु, मी तिला नेहमीच सांगतो की, ती माझी मुलगी आहे. मी माझ्या मुलांप्रमाणे तिचे लाड करतो, तिला समजावतो. माझ्या मुलीची काळजी घेण्यासाठी मी आई-वडिल दोन्ही ही बनतो. 

त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल झालेला पाहायला मिळाला. यातून पुन्हा एकदा बाप आणि मुलींचे नातं समजलं. जगभरातील अनेकांच लक्ष वेधून घेतले आहे. तसेच मुलीवरील नि: शर्त प्रेम आणि वचनबद्धतेबद्दल हसू आणि कौतुकही वाटले.   

Web Title: Single dad dresses up as 'Mom' for Mother's Day event for adopted daughter video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.