पाणी तापविण्यासाठी अनेक घरांमध्ये गिझरऐवजी हीटिंग रॉड वापरला जातो. कारण तो वापरायला अतिशय सोपा असतो. काही ठिकाणी तर जे विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहतात किंवा पेईंग गेस्ट म्हणून राहतात ते देखील हीटिंग रॉड वापरून पाणी गरम करतात. आता तर हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या रॉडचे काम आता वाढणार आहे. हा रॉड जेव्हा आपण भरपूर वापरतो तेव्हा त्यावर हळूहळू पाण्यातल्या क्षारांचा पांढरट, पिवळट थर जमा झालेला दिसतो. हा थर त्या रॉडवर जमा झाल्यावर पाणी लवकर गरमही होत नाही. वीजेचं बीलही जास्त येते. त्यामुळेच तो थर काढून टाकणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करायचं ते पाहूया..(How to Clean Hard Water Stains on Heating Rod?)
हीटिंग रॉडवर जमलेला पांढरा, पिवळा थर कसा काढायचा?
हीटिंग रॉडवर जमलेला पांढरट, पिवळट थर काढून टाकण्यासाठी आपल्याला बेकिंग सोडा आणि लिंबू हे दोन घटक लागणार आहेत.
केसांची वाढ होण्यासाठी आवळ्याचा खास उपाय! गुडघ्यापर्यंत लांब होतील केस, त्वचाही हाेईल सुंदर
सगळ्यात आधी एका वाटीमध्ये थोडा बेकिंग सोडा घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस घाला आणि त्याची एक घट्ट पेस्ट तयार करून घ्या.
आता ही पेस्ट रॉडवर जमा झालेल्या पांढऱ्या भागाला लावा आणि त्यानंतर ५ ते ७ मिनिटांनी एखादा खराब टुथब्रश घेऊन तो रॉड घासून काढा.
रॉड घासत असताना त्यावर अधूनमधून थोडं गरम पाणी घाला. राॅडवर जमा झालेली घाण निघून जाईल. यानंतर गरम पाण्याने रॉड स्वच्छ धुवून घ्या.
मारवाड स्टाईल लसूण चटणी! चाखून पाहताच म्हणाल वाह वाह.. घ्या ५ मिनिटांत होणारी सोपी रेसिपी
जर रॉड खूपच जास्त घाण झाला असेल किंवा वरील उपाय करूनही रॉडवरचा पांढरट थर निघून गेला नसेल तर तो रॉड व्हिनेगरमध्ये काही मिनिटांसाठी भिजत ठेवा. त्यानंतर तो घासून काढा. डाग लगेच निघून जातील. महिन्यातून एकदा या पद्धतीने रॉड स्वच्छ केला तर तो खूप घाण होणारच नाही.
