Join us  

पंखा- एसीमुळे बिलाचा आकडा वाढतो? ५ टिप्स- पैसे आणि वीज दोन्हींची होईल बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 5:27 PM

Simple Tips To Reduce Electricity Bill This Summer : आपण सगळेच आपल्या घरात इलेक्ट्रिक उत्पादनांचा वापर करतो. ज्यामुळे बीलाचा आकडा वाढत जातो.

लाईटबील (Electricity Bill) कमी यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत पंखा, एसी या उपकरणांचा जास्त वापर केल्यामुळे लाईटबील वाढतच जातं. ( 5 Ways to Reduce Electricity Bill At Home) लाईटबील जास्त आल्यामुळे पूर्ण महिन्याचे बजेट बिघडू शकते. लाईट बील कमी येण्यासाठी काही खास टिप्स फायदेशीर ठरू शकतात. यामुळे विजबीलात बचत होण्यात मदत होईल आणि जास्त पैसेही खर्च होणार नाहीत याशिवाय डोकंही शांत राहील. (Simple Tips To Reduce Electricity Bill This Summer)

आपण सगळेच आपल्या घरात इलेक्ट्रिक उत्पादनांचा वापर करतो. ज्यामुळे बीलाचा आकडा वाढत जातो.  जर तुम्हाला विजेची बचत करायची असेल तर अशा उत्पादनांचा वापर पूर्णपणे बंद करावा यामुळे बील उगाचच वाढत जाते. वापर पूर्ण बंद करता येत नसेल तर कमी तरी करावा. ज्यामुळे वीजेचे बील आपोआप कमी होईल.

1) घरात एलईडी बल्ब लावा

लाईटबील कमी करण्यासाठी घरात ट्युबलाईट काढून एलईडी बल्ब लावा. बाजारात २ वॅटपासून ते ४० वॅटपर्यंत एलडीएडी बल्ब उपलब्ध आहेत.  तुम्ही आपल्या गरजेनुसार या बल्बची निवड करू शकता. 

डोळ्यांखाली बारीक लाईन्स दिसू लागल्या? ५ उपाय; वय वाढीच्या खुणा, सुरकुत्या दिसणारच नाही

2) जुने फॅन काढून  BLDS फॅन लावा

जर तुमच्या घरात खूप जुने फॅन असतील  तर त्वरीत बदला. कारण  हे फॅन १०० ते १४०   वॅटचे असतात. बाजारात नवीन टेक्नोलॉजीनुसार  BLDS फॅन आले आहेत. जे  ४० वॅटपर्यंत असतात. ज्यामुळ विजेच्या बीलात बचत होते आणि खर्चही कमी होतो.  

3) एन्हर्टर एसीचा वापर  करा 

जर तुमच्याघरी नॉर्मल विंडो एसी असेल तर असा एसी काढून घरात त्वरीत इन्वर्टर एसी लावा. इन्व्हर्टर एसीमुळे वीजेचे बील कमी होते.  आणि यात अशी सिस्टीम असते ज्यामुळे विजेचे बील  कमी येते. 

4) स्विच ऑफ करायाला विसरू नका

जेव्हा कधी तुम्ही खोलीच्या बाहेर जाल तेव्हा खोलीमधील बटन्स बंद करायला विसरू नका.  होम अप्लायंसचा वापर झाल्यानंतर लाईट्स, पंखे बंद करा रिमोटने ऑफ करा त्यानंतर स्विच ऑफ करा.  कारण अनेकदा आपण  रिमोटने बंद करतो पण  त्यामुळे  वीजबील येतच राहतं म्हणून बटन्स स्विच ऑफ करायला विसरू नका.  

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया