Join us

भारी आयडिया!! पावसाळ्यात लाईट गेल्यावर 'हा' उपाय करा, बाटलीभर पाण्यामुळे घरभर उजेड पसरेल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2025 15:33 IST

Simple Tips For Lightning House If Electricity Is Not Available: पावसाळ्यात लाईट जाण्याचं प्रमाण खूप वाढतं. त्यामुळे हा उपाय माहिती असलेला बरा..

ठळक मुद्दे ही एक भन्नाट आयडिया पाहा आणि पाण्याच्या बाटलीचा वापर करून घरभर उजेड पसरवा..

अवकाळी पाऊस सध्या सगळीकडेच खूप जोरात सुरू आहे. त्यामुळे ऐन उन्हाळा असूनही तो संपल्यासारखा आणि पावसाळा सुरू झाल्यासारखा वाटतो आहे. आता पावसाळा सुरू झाला म्हटलं की बऱ्याचदा सोसाट्याचा वारा सुटून मुसळधार पाऊस येतो. असं झाल्यानंतर सगळ्यात पहिले तर घरातले लाईट जातात. रात्रीच्या वेळी लाईट गेले तर घरभर अंधार पसरतो आणि अनेक कामे खोळंबतात. सगळ्यांकडेच इन्व्हर्टर नसते. त्यामुळे मग मेणबत्ती, कंदिल अशा गोष्टींची मदत घ्यावी लागते. हल्ली अंधारात आपल्या मदतीला मोबाईलचा टॉर्चही असतो. पण या सगळ्या गोष्टींमुळे पडणारा प्रकाश खूपच तुटपुंजा असतो. त्यामुळेच आता ही एक भन्नाट आयडिया पाहा आणि पाण्याच्या बाटलीचा वापर करून घरभर उजेड पसरवा..(simple tips for lightning house if electricity is not available)

 

लाईट गेल्यावर घरातला अंधार दूर करण्यासाठी उपाय

रात्रीच्या वेळी लाईट गेल्यानंतर घरभर प्रकाश पसरविण्यासाठी काय उपाय करता येईल याविषयीची माहिती chanda_and_family_vlogs या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

तुळस सारखी सुकते, वाढतच नाही? कुंडीतली माती 'या' पद्धतीने भरा- तुळस वर्षभर राहील हिरवीगार

हा उपाय अतिशय मस्त असून अनेक नेेटिझन्सला तो खूप आवडला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला मोबाईलचा टॉर्च आणि अर्ध्या लीटरची पाण्याची बाटली एवढ्या दोनच गोष्टी लागणार आहेत.

त्यासाठी तर सगळ्यात आधी पाण्याची बाटली पाण्याने भरून घ्या. आता ज्या खोलीमध्ये उजेड करायचा आहे त्या खोलीच्या मध्यभागी एखादा टिपॉय किंवा टेबल ठेवा आणि त्यावर मोबाईल ठेवा.

 

मोबाईलचा टॉर्च सुरू करा. आता मोबाईलच्या टॉर्चवर पाण्याने भरलेली बाटली ठेवा. मोबाईलच्या टॉर्चमुळे पाण्यावर प्रकाश पडेल आणि त्याचा उजेड घरभर पसरेल.

Simple Rangoli: रोज घरासमोर काढण्यासाठी २ मिनिटांत होतील अशा सोप्या रांगोळ्या- १० आकर्षक डिझाईन्स

ही आयडिया तर एकदम मस्त आहे. पण हा प्रयोग करताना आपण पाण्याने भरलेली बाटली मोबाईलच्या टॉर्चवर ठेवणार आहोत. त्यामुळे बाटली कुठे ओली तर नाही ना, बाटली गळत नाही ना हे एकदा तपासून पाहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मोबाईलला बाटलीतल्या पाण्याचं ओझं पेलणार आहे की नाही याचाही अंदाज घ्या.

 

टॅग्स :सोशल व्हायरलपाऊसवीजमोबाइलमोसमी पाऊसहोम रेमेडी