Join us
Daily Top 2Weekly Top 5

शमिता शेट्टीच्या रेशमी ड्रेसवर चक्क चांदीचे वर्क! ४२ हजारांच्या या ड्रेसची काय आहे खासियत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 13:28 IST

नवरात्री निमित्त अभिनेत्री शमिता शेट्टी हिने केलेलं ड्रेसिंग कमालीचं हिट झालं आहे. पर्पल रंगाच्या या ड्रेसमध्ये शमिता अतिशय आकर्षक दिसत असून तिच्या ड्रेसची किंमत आणि ड्रेसची खासियत मात्र सर्वसामान्यांची झाेप उडविणारी आहे. 

ठळक मुद्देशमिताचा हा ड्रेस पुर्णपणे सिल्कचा आहे. पण एवढ्यावरच या ड्रेसची खासियत थांबत नाही.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी अशी एवढीच शमिता शेट्टीची ओळख मर्यादित नाही. अर्थात शिल्पाएवढी लोकप्रियता शमिताच्या वाट्याला आलेली नसली तरी शमिताचा असा एक स्वतंत्र चाहता वर्ग आहे. अगदी अलिकडेच बिग बॉसच्या निमित्ताने शमिता पुन्हा एकदा चर्चेच आली होती. नवरात्रीनिमित्त फेस्टीव्ह लूक असणारा एक फोटो शमिताने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये शमिताने घातलेल्या ड्रेसची जबरदस्त चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे.

 

नवरात्रीनिमित्त अनेक सेलिब्रिटींच्या घरी उत्साहाचे वातावरण होते. नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाचा जो रंग असेल, त्या रंगानुसार ड्रेसिंग करून सेलिब्रिटी त्यांचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत होते. शमिताने सुद्धा दसऱ्याच्या दिवशी तिचा एक फोटो सोशल मिडियावर टाकला होता. दसऱ्याच्या दिवशीचा रंग पर्पल होता. त्यामुळे शमितानेही पर्पल रंगाचा ड्रेस घातला होतो. हा तिचा ड्रेस तिला पुर्णपणे इथनिक लूक देणारा होता. 

 

कसा होता शमिताचा ड्रेस?पुर्वी रेशमी म्हणजेच सिल्कच्या साड्या अशा पद्धतीच्या होत्या की त्यावर सोन्याने किंवा चांदीने जरीकाम केलेले असायचे. सिल्कची साडी आणि सोन्या- चांदीची जर अशा पैठणी, बनारसी साडी किंवा इतर प्रकारच्या साड्या पुर्वी राजघराण्यातल्या स्त्रिया नेसायच्या. शमिताचा ड्रेसदेखील काहीसा याच प्रकारात मोडणारा आहे. शमिताने घातलेला हा पर्पल रंगाचा ड्रेस पुर्णपणे सिल्कचा आहे. स्कर्ट, ब्लाऊज आणि त्यावर गुडघ्याच्या वरपर्यंत असणारे जॅकेट अशा पॅटर्नचा हा ड्रेस आहे. या ड्रेसला कंबरेवर बांधण्यासाठी एक बेल्ट असून त्यामुळे तर तो ड्रेस आणखीनच ट्रेण्डी दिसत आहे. ड्रेसच्या बाह्या कोपरापर्यंत लांब असून बाह्यांवर पुर्णपणे जरीकाम केले आहे. या ड्रेसचे जॅकेट अशा पद्धतीने घेतलेले आहे की ती ओढणी आहे, की जॅकेट हे चटकन लक्षात येत नाही. जॅकेटच्या वरून कंबरपट्टा बांधल्याप्रमाणे बेल्ट लावलेला आहे. 

 

आहे तरी काय या ड्रेसची खासियत?आधीच सांगितल्याप्रमाणे शमिताचा हा ड्रेस पुर्णपणे सिल्कचा आहे. पण एवढ्यावरच या ड्रेसची खासियत थांबत नाही. या ड्रेसवर जी नक्षी विणण्यात आली आहे, ती पुर्णपणे चांदीने केलेली आहे. म्हणजेच रेशमी ड्रेस आणि त्यावर चांदीची जर अशा पद्धतीचा हा ड्रेस अतिशय क्लासिक आहे. ड्रेसवरची नक्षी अतिशय नाजूक असून मोठ्या नजाकतीने विणण्यात आली आहे. कंबर पट्टयावरही याच पद्धतीने विणकाम करण्यात आले आहे.

 

त्यामुळेच तर या ड्रेसची किंमत चक्क ४२ हजार रूपये एवढी आहे. प्रत्युषा गरिमेला यांनी हा ड्रेस डिझाईन केला आहे. हा ड्रेसच एवढा सुंदर आहे, की त्यावर आणखी वेगळी ज्वेलरी घालण्याची अजिबातच गरज नाही. त्यामुळे केवळ चांदीचे वर्क असणारे मोठे इअरिंग्स एवढीच काय ती ज्वेलरी शमिताने या ड्रेसवर घातली आहे. तिने मेकअपदेखील अतिशय लाईट केला असून केसांना कर्ल करून ते मोकळे साेडले आहेत. एकंदरीतच शमिताच्या रेशमी ड्रेसवरची चांदीची जर सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलनवरात्रीशिल्पा शेट्टीसेलिब्रिटी