Join us

शाळेची पायरी न चढलेली पोर बोलतेय फाडफाड इंग्रजी, ६ भाषा बोलणाऱ्या मुलीचा पाहा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2025 19:03 IST

'Shumaila' Famous Multilingual Girl : पाकिस्तानातल्या या मुलीचा व्हिडिओ सध्या व्हायरल आहे, तिचे भाषा कौशल्य कौतुकास्पदच आहे.

शाळेत आपण इंग्रजी तृतीय भाषा म्हणून शिकल्यावरही ती छान अस्खलित बोलायचा प्रयत्न करताना बरेचदा बोबडी वळते.('Shumaila' Famous Multilingual Girl) विविध भाषा बोलणारे बहुभाषीक लोक तर आपण बघतोच. भाषांचे शिक्षण घेऊन त्यात पदव्या मिळविणारे लोक असतात. पण काही असे असतात जे भाषा संवाद साधता यावा या एकाच उपदेशाने शिकतात.('Shumaila' Famous Multilingual Girl) खास करून विक्रेते अशा भाषा शिकून घेतात. जेणेकरून ग्राहकांशी बोलता येईल. अशीच एक बहुभाषी चिमुरडी सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. एका पाकिस्तानी व्लॉगरने या मुलीचा व्हिडीओ सोशल मिडियावर टाकला.('Shumaila' Famous Multilingual Girl) शाळेत न जाता आणि मातृभाषा उर्दू असूनसुद्धा तिला छान अस्खलित इंग्रजीत संवाद साधता येतो. तिच्या बोलण्यातल्या आत्मविश्वासामुळे ती जगभरातून लोकप्रियता मिळवत आहे.

या मुलीचे नाव शमाईला आहे. ती पाकिस्तानमधील पेशावर या ठिकाणची रहिवासी आहे. या मुलीला इंग्रजी तर छान जमतंच पण ती एकूण सहा भाषांमध्ये संवाद साधू शकते. तिला इंग्रजी, उर्दू, पंजाबी, पश्तो, चित्राली, सरायकी या ६ भाषा या मुलीला बोलता येतात. कधीही शाळेचा पायरी न चढलेल्या शमाईलाला एवढ्या भाषा कशा येतात असा प्रश्न विचारल्यावर कळले की तिला तिच्या वडिलांनी घरच्या घरीच भाषा शिकवल्या. तिच्या वडीलांना चौदा भाषांमध्ये संवाद साधता येतो. शमाईलाचा परिवार फार मोठा आहे. तिच्या वडिलांची एकूण पाच लग्न झाली असून त्या पाचही जणी एकत्र राहतात. शमाईलाला एकूण ३० भावंडे आहेत.

त्या पाचही जणी, तिचे वडील आणि ३०च्या ३० भावंडे इंग्रजी बोलतात. शाळेत न जाणारे वडिलांकडून भाषा शिकतात. तिचा एक भाऊ इंग्लंडमध्ये राहतो. शमाईला दाणे, बिया असे विविध खाण्याचे पदार्थ विकण्याचे काम करते. ग्राहकांशी तिला छान संवाद साधता येतो. त्यामुळे ती पेशावरमध्ये प्रसिद्ध आहे. तिचे भाषा कौशल्य नक्कीच कौतुकास्पद आहे.

टॅग्स :पाकिस्तानइंग्रजीप्रेरणादायक गोष्टी