हिवाळा सुरू होताच आपल्या दैनंदिन गरजा बदलतात. थंड पाण्याची गरज कमी होते, फळं आणि भाज्या लवकर खराब होत नाहीत आणि आईस्क्रीमही कमी खातो. अशा वेळी अनेक लोक विचार करतात की, थंडीच्या दिवसांत फ्रीज बंद करून ठेवावा, जेणेकरून वीजही वाचेल आणि फ्रीजचं आयुष्यही वाढेल. पण, असं केल्याने तुमच्या फ्रीजचं मोठं नुकसान होऊ शकतं. ते कसं, हे जाणून घेऊया.
थंडीत फ्रीज का बंद करू नये?
फ्रीजचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचा कॉम्प्रेसर असतो, जो सतत कूलिंग कायम ठेवतो. जर फ्रीज दीर्घकाळ बंद राहिला, तर कॉम्प्रेसरच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. अनेक प्रकरणांमध्ये गॅस लीक होण्यासारखी समस्या देखील उद्भवू शकते आणि ते दुरुस्त करणं महाग पडू शकतं. थंडीच्या दिवसांत फ्रीज पूर्णपणे बंद करण्याऐवजी लो कूलिंग लेव्हलवर चालवणं जास्त सुरक्षित ठरतं.
थंडीत फ्रीज वीज वाचवतो
फ्रीज वर्षभर सारखीच वीज वापरतो, हा एक सामान्य गैरसमज आहे. हिवाळ्यात बाहेरचं तापमान कमी असतं, त्यामुळे कॉम्प्रेसरला जास्त मेहनत करावी लागत नाही. फ्रीज आपोआप कमी वीज वापरतो. जर तुम्ही त्याला किमान कूलिंग लेव्हलवर (लेव्हल १ किंवा २) सेट केलं, तर विजेची बचत आणखी वाढते.
आजकाल अनेक फ्रीजमध्ये Winter Mode किंवा Eco Mode चा पर्याय उपलब्ध असतो. हा मोड थंडीच्या काळात फ्रीज चालवण्यासाठीच दिलेला असतो. यामुळे कॉम्प्रेसरवर कोणताही अतिरिक्त दबाव येत नाही. या मोड्समध्ये फ्रीजची कूलिंग आपोआप हवामानानुसार ॲडजस्ट होत राहतं.
थंडीत फ्रीजबाबतच्या योग्य टीप्स
- फ्रीज दीर्घकाळ बंद ठेवू नका.
- कूलिंग किमान लेव्हलवर सेट करा.
- Winter किंवा Eco Mode चा वापर करा.
