Join us

वर्षभरात किती किस घेतले हे सांगणारं पीपीटी ‘तिने’ केलं आणि सोशल मीडियात शेअरही केलं, कारण..व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2022 18:51 IST

Social Viral सोशल मीडियात लोक काय शेअर करतील याचा काही मेळ नाही, त्यातलाच हा एक व्हिडिओ

''जमाना काफी आगे बढ चुका है'', हे वाक्य आपण जुन्या पिढीकडून ऐकलंच असेल. तंत्रज्ञानाच्या बाबतीत असो या विचारांच्या सगळ्याच बाबतीत माणूस पुढे पाऊल टाकत आहे. सध्या सोशल मीडिया हे एक असं माध्यम बनलं आहे, जिथे कोणत्याही देशातील व्यक्ती सहजरित्या एकमेकांशी कनेक्ट होऊ शकते. त्यावर दिलखुलासपणे आपले मत मांडले जाते अथवा खासगी आयुष्यातील काही किस्से शेअर केले जातात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता तुम्हीच पाहा, म्हणजे वर्षभरात आपण किती किस घेतले याचं कुणी पीपीटी करतं का.. पण या बाईंनी केलंय ते..

तालिया लेविस कोल असे त्या महिलेचे नाव असून, ती एक मॉडेल आणि टिकटॉकर आहे. तिने एक व्हिडिओ सोशल मीडीयावर नुकताच शेअर केला आहे. ज्यात तिने एक पॉवरपॉइंट सादर केले. पण हे पॉवरपॉइंट कामाच्या संदर्भात नसून, चुंबनाच्या संदर्भात आहे. २०२२ हे वर्ष सरत चालले आहे. तिने या वर्षी किती मुलांचे चुंबन घेतले, तिचा एकूणच अनुभव कसा होता, याची सविस्तर माहिती दिली आहे.या महिलेचं अजब कारनामा पाहून  व्हायरल झाला आहे. व्हिडिओला कॅप्शन देत ती म्हणते ''बिल बनवण्यासाठी तुम्ही प्रेझेंटेशन आणि एक्सेल शीट तयार करणारे लोकं पाहिले असतील, आता चुंबनांवर पॉवरपॉइंट बनवणारे पहा''.

या व्हिडिओमध्ये तिच्या हातात लॅपटॉप आहे. यात ती एक - एक स्लाईड उघडून २०२२ मध्ये किती चुंबन घेतले याचा अनुभव शेअर करतेय. तिने व्हिडिओमध्ये सांगितले की, ''एका वर्षात १० किस घेतले, जे १८ ते ३२ वर्षांच्या लोकांमध्ये झाले. सादरीकरण करण्यासाठी खूप वेळ लागला पण ही गोष्ट खूप मनोरंजक होती''.सध्या हा व्हिडिओ सोशल मिडीयावर खूप व्हायरल होत आहे. अनेकांनी तिच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले आहे. तर कुणी टीका...आता ऐकावं पाहावं ते नवलच नाही का?

टॅग्स :माध्यमेसोशल मीडियासोशल व्हायरल