उत्तर-पूर्व भारतातील एका छोट्याशा प्रदेशातून आलेली एक साधी, शांत कथा थेट जागतिक चित्रपटविश्वात पोहोचते, हे ऐकायला जरी आश्चर्यकारक वाटत असले तरी 'शेप ऑफ मोमो' या चित्रपटाने ते सिद्ध करून दाखवलं. दिग्दर्शिका त्रिबेनी राय हिचा हा पहिलाच चित्रपट, पण त्याने मिळवलेले यश हे खरोखरच उल्लेखनीय आहे. (Shape of Momo: The story of a young woman from Sikkim, people loving this movie because ....)जगभरातील अनेक दिग्गजांनी चित्रपटाची नोंद घेतली. विषयही फार गंभीर किंवा ताणतणावाचा नसला तरी फार महत्वाचा आणि समाजासाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. चित्रपटाची कथा बिष्णु नावाच्या तरुणीभोवती फिरते. शहरात स्वतःच्या अटींवर जगण्याची सवय लागलेली ही मुलगी अचानक आपल्या सिक्कीममधील गावात परतते. नक्की का परत गावी येते तिचं लग्न झालं आहे की नाही असे प्रश्न चित्रपट पाहताना पडतील. गावी परत तर ती येते मात्र तिथे तिला पुन्हा परंपरा, कुटुंबाच्या अपेक्षा आणि समाजाच्या चौकटींचा सामना करावा लागतो. शहरातील स्वातंत्र्य आणि गावातील बंधने यांच्यामध्ये अडकलेली तिची मन:स्थिती अत्यंत वास्तववादी पद्धतीने दाखवली आहे. कोणताही मोठा नाट्यमय प्रसंग न घडवता, तिच्या मनात चालणारा संघर्ष, नात्यांमधील अंतर आणि स्वतःची ओळख शोधण्याची झुंज हा चित्रपट शांतपणे उलगडत नेतो. विशेष म्हणजे आजी, आई आणि बिष्णु या तीन पिढ्यांतील महिलांमधून स्त्रीजीवनातील बदलही प्रभावीपणे दाखवले आहेत.
या चित्रपटामागे त्रिबेनी राय हिचा स्वतःचा संघर्षही तितकाच महत्त्वाचा. सिक्कीमसारख्या लहान प्रदेशातून येऊन, मोठ्या इंडस्ट्रीचा आधार नसताना चित्रपट बनवणे हे सोपं नाही. मर्यादित साधनसामग्री, अनुभव आणि स्त्रीजीवनाविषयीची संवेदनशील दृष्टी यांच्या जोरावर तिने हा चित्रपट साकारला. म्हणूनच शेप ऑफ यू ही केवळ एक कथा नसून तिच्या आयुष्याच्या अनुभवांची झलक वाटते. या प्रामाणिकतेमुळेच चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी दखल मिळाली. बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येथे त्याचा वर्ल्ड प्रीमियर झाला आणि तिथेच त्याला महत्त्वाचे पुरस्कार मिळाले. तसेच कान चित्रपट महोत्सव आणि सान सेबॅस्टियन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यांसारख्या प्रतिष्ठित मंचांवरही त्याची दखल घेण्यात आली. याशिवाय हा चित्रपट १० पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाला आहे. कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम चित्रपटाचा मान मिळवत, तसेच इतर ठिकाणीही सन्मान पटकावत त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Web Summary : Sikkim's 'Shape of Momo' wins global acclaim. A young woman returns home, grappling with tradition versus city life. The film quietly explores identity, family, and female generational changes, earning awards at prestigious international film festivals.
Web Summary : सिक्किम की 'Shape of Momo' ने वैश्विक प्रशंसा जीती। एक युवती घर लौटती है, जो परंपरा बनाम शहरी जीवन से जूझती है। फिल्म चुपचाप पहचान, परिवार और महिला पीढ़ीगत परिवर्तनों का पता लगाती है, प्रतिष्ठित अंतरराष्ट्रीय फिल्म समारोहों में पुरस्कार अर्जित करती है।