Lokmat Sakhi >Social Viral > शाहरुख खानच्या सासूबाईंनी धरला ठेका, व्हिडिओ व्हायरल-गौरी म्हणाली माझी आई कमाल...

शाहरुख खानच्या सासूबाईंनी धरला ठेका, व्हिडिओ व्हायरल-गौरी म्हणाली माझी आई कमाल...

Shah Rukh Khan's Mother-In-Law Flaunts Her Dance Moves, Fans Say 'Secret Behind Gauri's Aura : Shah Rukh Khan dancing with mom-in-law Savita Chibber is the cutest thing you will see on the internet today : शाहरुख खानची सासू सविता छिब्बर यांचा डान्स करतानाचा व्हायरल व्हिडिओ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2025 18:48 IST2025-08-23T18:33:31+5:302025-08-23T18:48:48+5:30

Shah Rukh Khan's Mother-In-Law Flaunts Her Dance Moves, Fans Say 'Secret Behind Gauri's Aura : Shah Rukh Khan dancing with mom-in-law Savita Chibber is the cutest thing you will see on the internet today : शाहरुख खानची सासू सविता छिब्बर यांचा डान्स करतानाचा व्हायरल व्हिडिओ..

Shah Rukh Khan's Mother-In-Law Flaunts Her Dance Moves, Fans Say 'Secret Behind Gauri's Aura Shah Rukh Khan dancing with mom-in-law Savita Chibber is the cutest thing you will see on the internet today | शाहरुख खानच्या सासूबाईंनी धरला ठेका, व्हिडिओ व्हायरल-गौरी म्हणाली माझी आई कमाल...

शाहरुख खानच्या सासूबाईंनी धरला ठेका, व्हिडिओ व्हायरल-गौरी म्हणाली माझी आई कमाल...

शाहरुख खान बॉलिवूडचा किंग... शाहरुख सध्या आपला लेक आर्यन खानच्या डेब्यूमुळे सगळ्याच सोशल मिडिया माध्यमांवर चर्चेचा विषय ठरत आहे. सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान (Shah Rukh Khan's Mother-In-Law Flaunts Her Dance Moves, Fans Say 'Secret Behind Gauri's Aura) यांनी लेक आर्यन खानच्या दिग्दर्शनात पदार्पण केलेल्या 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' या चित्रपटाचा प्रिव्ह्यू लाँच केला. या खास प्रसंगी शाहरुखने लेकाला दिलेला खास सल्ला आणि त्यावर लेकाने दिलेले खास उत्तर असं सगळंच नुकतेच चर्चेत असताना, पुन्हा एकदा शाहरुख खानची सासू म्हणजेच गौरी खानची आई सविता छिब्बर यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे(Shah Rukh Khan dancing with mom-in-law Savita Chibber is the cutest thing you will see on the internet today).

आता व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, गौरी खानची आई तिचा मुलगा विक्रांतसोबत तिचे नृत्य कौशल्य दाखवताना दिसत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, शाहरुख खानची सासू सविता छिब्बर डान्स करताना दिसत आहे. शाहरुख खान आणि गौरी खानची भाची आलिया हिने अलिकडेच इंस्टाग्रामवर सविता आणि विक्रांत यांचा नाचतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आह 

शाहरुख खानच्या सासूबाईंचा डान्स व्हिडिओ व्हायरल, चाहते म्हणाले... 

शाहरुख खानची सासू आई सविता छिब्बर यांचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. सविता यांचा हा व्हिडिओ त्यांच्या कौटुंबिक गेट-टुगेदर दरम्यानचा आहे. या व्हिडिओमध्ये ७८ वर्षांच्या सविता आपल्या मुलगा म्हणजे गौरी खानचे भाऊ विक्रांत यांच्यासोबत नाचताना दिसत आहेत.

शाहरुख खानची पत्नी गौरी खान नेहमीच तिच्या क्लासी आणि सुंदर लूकमुळे चर्चेत असते. पण आता तिच्या सौंदर्याचं रहस्य समोर आलं आहे, आणि ते म्हणजे तिच्या आईचा उत्साही स्वभाव! नुकताच गौरीची आई सविता छिब्बर यांचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये सविता छिब्बर एका कौटुंबिक कार्यक्रमात अतिशय उत्साहाने डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा बिनधास्त अंदाज आणि चेहऱ्यावरचं हसू पाहून अनेक चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

एका चाहत्याने लिहिले, "आता कळलं गौरी इतकी सुंदर आणि फ्रेश कशी दिसते, हे तिच्या आईकडून आलं आहे!" तर दुसऱ्या एका युजरने "गौरीच्या सौंदर्याचं रहस्य त्यांची आई आहे" अशी कमेंट केली. या व्हिडिओने गौरीच्या आईचा फिटनेस आणि लाईफस्टाईलबद्दलही कौतुक होत आहे.  

‘फक्त एक गोष्ट कर, सक्सेस मिळणारच!’- बाप म्हणून शाहरुख खानने आर्यन खानला दिला जाहीर सल्ला...


‘माझ्या दोन आवडत्या व्यक्ती – आजी आणि माझे पप्पा’... 

आलियाने शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये सविता छिब्बर यांच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी फ्लोरल कुर्ती घातली होती, ज्यात त्या अतिशय सुंदर दिसत होत्या. या वयातही सविता यांचे डान्स मूव्हज पाहण्यासारखे होते.

व्हिडिओ शेअर करताना आलियाने लिहिले – “आता तुम्हाला कळलं की मला हे सगळं माझ्या जीन्समध्ये कुठून आलं आहे. माझ्या दोन आवडत्या व्यक्ती – आजी आणि माझे पप्पा.”

आलियाने या व्हिडिओसाठी कॅप्शनमध्ये लिहिलं – “हे जीवन मला माझ्या आजीमुळेच मिळाले आहे.”

या व्हिडिओवर युजर्सकडून भरपूर कमेंट्स येत आहेत.

Web Title: Shah Rukh Khan's Mother-In-Law Flaunts Her Dance Moves, Fans Say 'Secret Behind Gauri's Aura Shah Rukh Khan dancing with mom-in-law Savita Chibber is the cutest thing you will see on the internet today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.