क्रिकेटच्या जगतातील देव समजला जाणारा सचिन तेंडूलकरचा लेक अर्जुन तेंडूलकरची सोशल मीडियामध्ये बरीच चर्चा आहे, कारणही तसंच आहे. अर्जुनच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि चर्चांना उधाण आलं. मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोक हिच्याशी अर्जुन तेंडूलकरनं साखरपूडा केला आहे. त्यानंतर चाहत्यांना या जोडप्याबद्दल बरेच प्रश्न पडत आहेत. सानिया कोण, तिचं कुटूंब काय करतं. असे बरेच प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. (Saniya Chandhok Net Worth Love Story Of Arjun Tendulkar) सोशल मीडीयावर बऱ्याच पोस्टही व्हायरल होत आहेत.
सचिन तेंडूलकरची होणारी सून सानिया ही पेट्स लव्हर आहे. तिनं लंडन स्कूल ऑफ इकोनोमिक्समधून बिजनेस मॅनेजमेंटची डिग्री घेतली आहे. सानिया चंडोक शिक्षणानंतर पेट इंडस्ट्रीकडे वळाली तिनं स्वत:चे पेट स्पा सेंटर उघडले आणि त्यात प्रिमियम पेट्स सर्विस दिली जाते. मुंबईत Mr. Paws Pet Spa & Store LLP नावाने हे सलून-स्पा उघडण्यात आलं आहे. या कंपनीचे वार्षिक उत्पन्न ९० लाख आहे.
कुटूंब
सानिया चंडोक मुंबईच्या एका मोठ्या घराण्यातील असून तिचे आजोबा रवी घई ग्रेविस ग्रुपचे मालक आहे आणि त्याचे अनेक बिझनेस चालवतात. आईस्क्रीम ब्रँड ब्रुकलिन क्रिमरी आणि बास्किन रॉबिंस इंडियाचे संचालक हा ग्रुप आहे. याव्यतिरिक्त त्यांच्या कुटूंबाचे मुंबईत इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलसुद्धा आहे. त्यांचे कुंटूंब अन्न आणि वैद्यकीय क्षेत्रातील कामात सक्रीय आहेत आणि टर्नओव्हर जवळपास १०० कोटींचा आहे.
सानिया चंडोक आणि अर्जुन तेंडूलकर या दोघांची भेट कशी झाली?
सानिया आणि अर्जुन एकमेकांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतात. दोन्ही कुटूंबांत जवळचे संबंध आहेत. सानिया आणि अर्जूनची बहीण सारा तेंडूलकर खूप आधीपासून मित्र आहेत. याच कारणामुळे अर्जुन आणि सानियाची भेट व्हायची. सगळ्यात आधी सारानंच अर्जून आणि सानियाची भेट घडवून दिली होती. सानिया ही साराची बेस्ट फ्रेंड आहे.