lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > आंघोळीनंतर तुमच्याकडूनही घाईत गिझर-बॉयलर सुरू राहतो? स्फोट होण्याचा धोका टाळा..

आंघोळीनंतर तुमच्याकडूनही घाईत गिझर-बॉयलर सुरू राहतो? स्फोट होण्याचा धोका टाळा..

Safety Tips for Using Geyser And Boiler at Home : गिझर किंवा बॉयलर वापरताना कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी काही महत्त्वाच्या टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2022 11:46 AM2022-10-21T11:46:39+5:302022-10-21T11:50:53+5:30

Safety Tips for Using Geyser And Boiler at Home : गिझर किंवा बॉयलर वापरताना कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी काही महत्त्वाच्या टिप्स

Safety Tips for Using Geyser And Boiler at Home : After a bath, do you also turn on the geyser-boiler in a hurry? Avoid explosion hazard.. | आंघोळीनंतर तुमच्याकडूनही घाईत गिझर-बॉयलर सुरू राहतो? स्फोट होण्याचा धोका टाळा..

आंघोळीनंतर तुमच्याकडूनही घाईत गिझर-बॉयलर सुरू राहतो? स्फोट होण्याचा धोका टाळा..

Highlightsरात्री झोपताना किंवा गावाला जाताना गॅस सिलिंडरचे आणि गिझरचे असे दोन्ही कनेक्शन पूर्णपणे बंद करा. बाथरूममध्ये आंघोळ सुरू करण्यापूर्वी गॅस गिझर बंद करा. त्यामुळे आंघोळ करताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. 

आपण सगळे रोज सकाळी किंवा काही वेळा दिवसातून २ वेळा आंघोळ करतो. आंघोळीसाठी आता पूर्वीप्रमाणे चूल पेटवणे किंवा बंब लावण्याची रीत मागे पडली आणि घरोघरी पाणी तापवण्यासाठी गॅस गिझर, इलेक्ट्रीक गिझर किंवा बॉयलर वापरले जाऊ लागले. सोय म्हणून ही साधने उपयुक्त असली तरी काही वेळा योग्य पद्धतीने वापरली नाहीत किंवा त्यामध्ये काही बिघाड झाला तर ती जीवावर बेतणारी ठरु शकतात. नुकताच हैद्राबादमध्ये डॉक्टर असलेल्या नवविवाहीत पती पत्नीचा शॉर्टसर्कीटमुळे स्फोट झाल्याने मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर गिझर आणि बॉयलरच्या वापराबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याआधीही नाशिकमध्ये वैमानिक असलेल्या साक्षी जाधव हिचा गॅस गिझरमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती (Safety Tips for Using Geyser And Boiler at Home). 

(Image : Google)
(Image : Google)

कधी गिझर बराच काळ सुरू राहिला म्हणून किंवा कधी त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला म्हणून त्याचा स्फोट होऊन जखमी होण्याच्या किंवा मृत्यू होण्याच्या घटना वारंवार घडतात. थंडीच्या दिवसांत तर आपल्याला जास्त गरम पाणी लागत असल्याने आपण सर्रास या उपकरणांचा वापर करतो. दिवाळीच्या दिवसांत घरी पाहुणे आल्यावरही गिझर किंवा बॉयलरचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. मात्र ही उपकरणे वापरताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे गिझर किंवा बॉयलर वापरताना कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती घेऊया...

१. गॅस गिझरमुळे होणाऱ्या दुर्घटना प्रामुख्याने बाथरूममध्ये व्हेंटिलेशन नसल्याने होतात. त्यामुळे बाथरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी ‘एक्झॉस्ट फॅन’ बसवणे आवश्यक आहे. अनेकदा बाथरुम बंद असल्याने आतमध्ये ऑक्सिजन नसतो, त्यामुळे गॅस गळतीनंतर गुदमरुन मृत्यू होण्याच्या दुर्घटना घडतात. गिझर लीक झाला तर कार्बन डायऑक्साईड तयार होण्यास सुरवात होते. कार्बनडाय ऑक्साईड वाढला की आत असणाऱ्या व्यक्तीला श्वसनाला त्रास होतो आणि अचानक त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे बाथरुममधून हवा बाहेर जाईल यासाठी असणारी लहान खिडकीची सोय योग्य पद्धतीने केलेली आहे ना याची वारंवार लक्षपूर्वक तपासणी व्हायला हवी. 

२. गॅस गिझर खरेदी केल्यानंतर त्याची फिटिंग प्रशिक्षित व्यक्तींकडून योग्य ठिकाणी करून घ्यावी. माहिती नसलेल्या व्यक्तीकडून चुकीची जोडणी केली गेल्यासही गॅस गळतीचा धोका उद्भवू शकतो. अनेकदा घरच्या घरी आम्हाला अमुक काम येते असे म्हणून गॅस गिझरची जोडणी केल्यास त्यामध्ये काही चुका राहू शकतात आणि अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गॅस पुरवठ्यासाठी फक्त रबरी पाइप न वापरता त्याला कॉपर फिटिंग करून घेणे आवश्यक असते. पण याची योग्य ती माहिती नसल्यास अचानक एखादवेळी अपघात घडतो आणि तो जीवावर बेतणारा ठरु शकतो. 

३. गॅस गिझरमध्ये गळती झाल्यास त्यातून कार्बन मोनोऑक्साइड वायू बाहेर पडतो. यामुळे चक्कर येणे, मळमळ, उलट्या, थकवा, गुदमरल्यासारखे होणे आणि पोटदुखी होऊ शकते. त्यामुळे पाणी काढून झाल्यानंतर गॅस गिझर बंद करणे आवश्यक आहे.  तसेच श्वास घेण्यास त्रास होणे या यासारख्या समस्याही निर्माण होतात. आंघोळ करताना किंवा नंतर अशी कोणतीही समस्या वाटल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता लगेचच डॉक्टरांकडे जायला हवे. 

(Image : Google)
(Image : Google)

४. गॅसचा वास येणे, बाथरुममध्ये वाफा दिसणे यांसारख्या गोष्टींकडे लक्ष द्या. गॅस गिझरला काही झाले आहे असे वाटल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने दुरुस्ती करुन घेणे गरजेचे आहे. गॅस गिझरची ठराविक कालावधीने तपासणी करत राहा. बाथरूममध्ये आंघोळ सुरू करण्यापूर्वी गॅस गिझर बंद करा. त्यामुळे आंघोळ करताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. 

५. गिझर जास्त वेळ चालू ठेवल्याने त्याच्या बॉयलरवर खूप दबाव येतो. गरम पाण्याचा दाब बॉयलरमध्ये गळतो. अशा परिस्थितीत हा बॉयलर तांब्याचा नसेल तर त्याचा स्फोट होतो. पण जर बॉयलर फुटला किंवा गळती झाली तर त्याचा करंट तुमचा जीव घेऊ शकतो. रात्री झोपताना किंवा गावाला जाताना गॅस सिलिंडरचे आणि गिझरचे असे दोन्ही कनेक्शन पूर्णपणे बंद करा. शक्यतो घरातील सगळ्यांच्या आंघोळी झाल्यानंतर गॅस गिझर पूर्णपणे बंद करा. 

Web Title: Safety Tips for Using Geyser And Boiler at Home : After a bath, do you also turn on the geyser-boiler in a hurry? Avoid explosion hazard..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.