Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > रितेश देशमुखने सांगितली घरातल्या सासूसुनेची खास गोष्ट, त्याचं इतकं जमतं की..

रितेश देशमुखने सांगितली घरातल्या सासूसुनेची खास गोष्ट, त्याचं इतकं जमतं की..

Ritesh Deshmukh About His Wife Genelia: रितेश देशमुखने त्याची पत्नी म्हणजेच अभिनेत्री जेनेलिया डिसुझा आणि त्याची आई म्हणजेच वैशाली देशमुख यांच्या नात्याविषयी काही मस्त किस्से सांगितले आहेत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2026 19:41 IST2026-01-19T16:19:21+5:302026-01-19T19:41:57+5:30

Ritesh Deshmukh About His Wife Genelia: रितेश देशमुखने त्याची पत्नी म्हणजेच अभिनेत्री जेनेलिया डिसुझा आणि त्याची आई म्हणजेच वैशाली देशमुख यांच्या नात्याविषयी काही मस्त किस्से सांगितले आहेत..

ritesh deshmukh open up about the relationship between genelia d'souza and his mother | रितेश देशमुखने सांगितली घरातल्या सासूसुनेची खास गोष्ट, त्याचं इतकं जमतं की..

रितेश देशमुखने सांगितली घरातल्या सासूसुनेची खास गोष्ट, त्याचं इतकं जमतं की..

Highlights हे सगळं ऐकून जेनेलिया आणि रितेशच्या चाहत्यांचं त्यांच्याप्रती असणारं प्रेम आणि आदर नक्कीच आणखी वाढलेला असणार...

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा ही महाराष्ट्रातली एक जबरदस्त जोडी. त्यांच्या जोडीला नेहमीच मराठी लोकांकडून भरभरून प्रेम मिळत आलं आहे. जेनेलिया थोडी अवखळ, चंचल वाटते. तर रितेश हा अतिशय समजूतदार वाटतो. त्या दोघांमध्ये कितीही फरक असला तरी नवरा- बायको म्हणून दोघं अगदी एक असून एकमेकांशी समरस झालेले आहेत. त्यामुळेच तर महाराष्ट्रात दोघं दादा- वहिनी म्हणूनच ओळखले जातात. आता जी जेनेलिया अभिनेत्री म्हणून किंवा रितेशची बायको म्हणून आपल्याला माहिती आहे ती जेनेलिया सून म्हणून देशमुखांच्या घरात कशी नांदते आहे, याविषयी रितेशनेच छान माहिती दिली आहे..(Ritesh Deshmukh open up about the relationship between Genelia D'souza and his mother)

 

जेनेलिया आणि रितेश हे दोघेही नुकतेच राहूल महाजन यांच्या पॉडकास्टमध्ये आले होते. त्यावेळी राहूलने जेनेलियाला प्रश्न विचारला की तू लग्नानंतर एका अशा मराठी कुटूंबात आली जे राजकारणात अतिशय स्ट्राँग आहे.

ना तुमचं वजन वाढणार, ना डायबिटीस होणार- डॉक्टर सांगतात जेवणानंतर फक्त १ गोष्ट करा 

तिथल्या वातावरणाचं तुला कधी दडपण आलं का? भीती वाटली का? यावर जेनेलिया म्हणाली की तिला या सगळ्या गोष्टींचा तिला कधीच ताण आला नाही. रितेश म्हणाला की ती लग्नाच्या आधी बऱ्याचदा देशमुखांच्या घरी आलेली आहे. ती जेव्हा केव्हा यायची तेव्हा ती आईशी किंवा वडिलांशीही खूप मोकळेपणाने वागायची, बोलायची. आणि आजही तेच आहे.

 

जेनेलिया म्हणते की मुळात देशमुख लोकं खूपच मनमिळाऊ आणि प्रेमळ आहेत. त्यामुळे त्यांचं कधीही दडपण येत नाही किंवा भीती वाटत नाही. एवढंच नाही तर तिचं आणि तिच्या सासुबाईंचं नातंही एकमेकींशी खूपच प्रेमाचं आहे.

संध्याकाळी हळदी- कुंकू, पण चेहरा डल दिसतो? घ्या उपाय- १० मिनिटांत मिळेल डायमंड फेशियलसारखा ग्लो

ती म्हणते त्या माझ्यासाठी माझ्या एखाद्या बेस्ट फ्रेंडसारख्या असून आमचं बाँडिंग खूप छान आहे. रितेशलाही ही गोष्ट पुर्णपणे मान्य असून तो म्हणतो आज माझ्या घरात अशी परिस्थिती आहे की माझी आई आणि मी आमच्या दोघांपेक्षाही जेनेलिया आणि माझी आई यांचं नातं खूप घट्ट, जवळचं झालं आहे.. हे सगळं ऐकून त्या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. हे सगळं ऐकून जेनेलिया आणि रितेशच्या चाहत्यांचं त्यांच्याप्रती असणारं प्रेम आणि आदर नक्कीच आणखी वाढलेला असणार...


 

Web Title : रितेश देशमुख ने जेनेलिया और अपनी माँ के बारे में मजेदार कहानियाँ बताईं।

Web Summary : रितेश देशमुख ने जेनेलिया के अपने परिवार में घुलने-मिलने, खासकर अपनी माँ के साथ उनके बंधन के बारे में उपाख्यान साझा किए। एक पॉडकास्ट में जेनेलिया ने देशमुख परिवार की गर्मजोशी से स्वागत महसूस करने की बात कही। रितेश ने बताया कि जेनेलिया अपनी माँ के साथ उससे ज़्यादा करीबी रिश्ता साझा करती हैं।

Web Title : Ritesh Deshmukh reveals funny stories about Genelia and his mother.

Web Summary : Ritesh Deshmukh shared anecdotes about Genelia's integration into his family, particularly her bond with his mother. Genelia, in a podcast, expressed feeling welcomed by the Deshmukh family's warmth. Ritesh highlighted that Genelia shares a closer relationship with his mother than he does.