Lokmat Sakhi >Social Viral > खसाखसा घासूनही काळीकुट्ट कढई निघत नाही, इवलासा तुरटीचा खडा मिनिटांत करेल कढई कोरीकरकरीत स्वच्छ...

खसाखसा घासूनही काळीकुट्ट कढई निघत नाही, इवलासा तुरटीचा खडा मिनिटांत करेल कढई कोरीकरकरीत स्वच्छ...

Remove rust from lokhandi kadhai : How to Clean Lokhandi Kadhai : remove black stains from kadhai : clean burnt iron kadhai : How To Clen Kadhai At Home : तुरटीचा खडा लोखंडी काळीकुट्ट, जुनी गंजलेली कढई देखील करेल मिनिटांत स्वच्छ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2025 15:02 IST2025-08-09T14:41:38+5:302025-08-09T15:02:28+5:30

Remove rust from lokhandi kadhai : How to Clean Lokhandi Kadhai : remove black stains from kadhai : clean burnt iron kadhai : How To Clen Kadhai At Home : तुरटीचा खडा लोखंडी काळीकुट्ट, जुनी गंजलेली कढई देखील करेल मिनिटांत स्वच्छ...

Remove rust from lokhandi kadhai How to Clean Lokhandi Kadhai remove black stains from kadhai clean burnt iron kadhai How To Clen Kadhai At Home | खसाखसा घासूनही काळीकुट्ट कढई निघत नाही, इवलासा तुरटीचा खडा मिनिटांत करेल कढई कोरीकरकरीत स्वच्छ...

खसाखसा घासूनही काळीकुट्ट कढई निघत नाही, इवलासा तुरटीचा खडा मिनिटांत करेल कढई कोरीकरकरीत स्वच्छ...

आपल्या सगळ्यांच्याच स्वयंपाकघरात एखादी लोखंडी कढई असतेच. लोखंडी कढईमध्ये तयार केलेले अन्नपदार्थ हे चवीला तर उत्तम लागतातच पण सोबतच ते आरोग्याच्या दृष्टीने देखील अधिक फायदेशीर ठरतात. परंतु वर्षानुवर्षे या लोखंडी कढईचा सतत वापर केल्याने कढई चिकट, तेलकट व काळीकुट्ट होऊन जाते. रोजच्या (Remove rust from lokhandi kadhai) वापरामुळे कढईवर तेल, मसाल्यांचे डाग आणि गंज साचून ती काळीकुट्ट दिसू लागते. अशी ही रोजच्या वापरातील लोखंडी कढई वेळीच योग्य पद्धतीने स्वच्छ केली नाही तर, त्यावर काळाकुट्ट थर साचत राहून ती ( How to Clean Lokhandi Kadhai) अधिकच खराब होते. अशा परिस्थितीत, अनेकजणी कढई घासून त्यावरील काळपट, चिकट थर घासून काढण्याचा प्रयत्न करतात, पण तरीही ती जुनीच वाटते. काहीवेळा ही कढई घासून देखील त्यावरील चिकट, काळाकुट्ट थर निघता - निघत नाही(remove black stains from kadhai).

रोजच्या वापरातील लोखंडी कढई वरील चिकट, काळाकुट्ट थर काढण्यासाठी आपण फार मेहेनत घेतो परंतु, एक सोपा घरगुती उपाय करून देखील आपण फारसे कष्ट न घेता लोखंडी कढई अगदी (clean burnt iron kadhai) मिनिटभरात स्वच्छ करु शकतो. घरातच उपलब्ध असणाऱ्या एका छोटाशा तुरटीच्या खड्याने देखील आपण कढईचा कळपटपणा झटपट स्वच्छ करु शकतो. कढईवरील काळपटपणा काढण्यासाठी तुरटीचा वापर नेमका कसा करायचा ते पाहूयात(How To Clen Kadhai At Home).

लोखंडी कढईवरील काळपटपणा घालवण्यासाठी काय उपाय आहे ? 

लोखंडी कढईवरील काळपटपणा घालवण्यासाठी आपल्याला एक छोटा तुरटीचा तुकडा, ग्लासभर पाणी, १ टेबलस्पून डिटर्जंट पावडर, १ टेबलस्पून डिशवॉश लिक्विड आणि तारेची घासणी इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

पावसाळ्यात फ्रिजमध्ये मीठ ठेवा, ही व्हायरल ट्रिक खरी आहे? खरंच फ्रिजमधला कुबट वास कमी होतो...


 

नेमका उपाय काय आहे ? 

स्टेप १ :- सर्वप्रथम कढई गॅसवर ठेवून त्यात एक ग्लसभर पाणी ओता. पाणी गरम होत असताना तुरटीचे तुकडे बारीक वाटून घ्या. पाणी कढईत गरम होऊन हलकेच उकळू लागल्यावर तुरटीची ही बारीक पूड त्यात घालावी. 

स्टेप २ :- तुरटीची पावडर पाण्यात घातल्यानंतर त्यात एक चमचा डिटर्जंट पावडरही टाका. आता साधारण ३ ते ४ मिनिटे फेस येईपर्यंत उकळू द्या. तुरटी  आणि डिटर्जंटचा फेस तयार होत असताना चमच्याच्या मदतीने हे द्रावण कढईच्या कडांवरही लावत रहा, ज्यामुळे कढईचा प्रत्येक भाग लवकर स्वच्छ होईल.

फ्रिजरमध्ये बर्फाचा डोंगर? ६ टिप्स, एका मिनिटात बर्फ वितळून फ्रिज होईल स्वच्छ...

गार झाल्यावरही टम्म फुगलेल्याच राहतील पुऱ्या! पाहा ५ टिप्स - मस्त पुऱ्या डब्यात द्या, सावकाश खा...

स्टेप ३ :- आता गॅस बंद करून कढई थोडीशी गार होऊ द्या. तुरटी आणि डिटर्जंटचे पाणी वेगळ्या भांड्यात काढून ठेवा. एक स्क्रबर घेऊन कढईला थोडंसं घासा आणि त्याचवेळी तुरटीचं पाणी वापरत राहा. नीट स्वच्छ केल्यानंतर कढईला कोरड्या कपड्याने पुसून घ्या. शेवटी गंज येऊ नये म्हणून त्यावर मोहरीचं तेल लावा.

काळीकुट्ट लोखंडी कढई स्वच्छ करण्यासाठी तुरटी कशी फायदेशीर... 

खरंतर, आपण जेव्हा तुरटी गरम पाण्यात टाकतो तेव्हा ती पाण्यात विरघळते आणि हलकासा आम्लीय द्राव तयार करते. हा द्राव गंज आणि काळपटपणा घालवण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतो. तुरटीतील हा आम्लीय द्राव लोखंडाच्या कढईवरील गंजाचा वरचा पातळ थर सैल करतो. याशिवाय तेल, मसाले आणि अन्नपदार्थांचे डाग यामुळे साचलेला चिकटपणाही सहजरित्या घालवतो. यासाठी तुरटीच्या मदतीने काळीकुट्ट चिकट - तेलकट झालेली लोखंडी कढई पटकन स्वच्छ होते.

Web Title: Remove rust from lokhandi kadhai How to Clean Lokhandi Kadhai remove black stains from kadhai clean burnt iron kadhai How To Clen Kadhai At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.