Lokmat Sakhi >Social Viral > साबण - डिटर्जंट वापरुनही कपड्यांवरील रंगाचे डाग निघत नाही? वापरा 'हे' असरदार सोल्युशन- डाग होतील गायब...

साबण - डिटर्जंट वापरुनही कपड्यांवरील रंगाचे डाग निघत नाही? वापरा 'हे' असरदार सोल्युशन- डाग होतील गायब...

Remove Holi Colour Stains From White Clothes With This Homemade Paste : How To Remove Holi Color Stains From White Clothes : Incredibly Easy Way To Get Holi Colours Off Your Clothes : रंग खेळून आल्यावर कपड्यांवरील हट्टी डाग काढणे म्हणजे कठीण काम, पण करून पाहा खास घरगुती उपाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2025 17:15 IST2025-03-15T17:01:04+5:302025-03-15T17:15:22+5:30

Remove Holi Colour Stains From White Clothes With This Homemade Paste : How To Remove Holi Color Stains From White Clothes : Incredibly Easy Way To Get Holi Colours Off Your Clothes : रंग खेळून आल्यावर कपड्यांवरील हट्टी डाग काढणे म्हणजे कठीण काम, पण करून पाहा खास घरगुती उपाय..

Remove Holi Colour Stains From White Clothes With This Homemade Paste How To Remove Holi Color Stains From White Clothes | साबण - डिटर्जंट वापरुनही कपड्यांवरील रंगाचे डाग निघत नाही? वापरा 'हे' असरदार सोल्युशन- डाग होतील गायब...

साबण - डिटर्जंट वापरुनही कपड्यांवरील रंगाचे डाग निघत नाही? वापरा 'हे' असरदार सोल्युशन- डाग होतील गायब...

कालच रंगपंचमीचा सण सगळ्यांनी मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला. आपल्यापैकी बरेचजण काल अगदी मनसोक्त रंग खेळले असतील. आपला मित्रपरिवार आणि जवळच्या खास व्यक्तींसोबत रंग (Remove Holi Colour Stains From White Clothes With This Homemade Paste) खेळताना आपले भान राहत नाही. रंग खेळताना या रंगांचे डाग शक्यतो आपल्या कपड्यांवरून निघता निघत नाहीत, यासाठी आपण बहुतेकवेळा वापरात नसलेले जुनेच (Incredibly Easy Way To Get Holi Colours Off Your Clothes) कपडे घालतो. परंतु रंगपंचमीच्या दिवशी आपल्याकडे पांढरेशुभ्र कपडे घालण्याची अनोखी प्रथा आहे. या प्रथेनुसार, आजही अनेकजण रंगपंचंमीच्या दिवशी अगदी नवीन पांढरेशुभ्र कपडे घालतात. परंतु या कपड्यांवरील रंगांचे डाग काढणे वाटते तितके सोपे काम नसते(How To Remove Holi Color Stains From White Clothes).

काहीवेळा डिटर्जंट, साबण वापरुन देखील कपड्यांवरील रंगांचे हट्टी डाग निघत नाहीत. अशावेळी नेमकं काय करायचं हे आपल्याला समजत नाही. यासाठीच, आपण कपड्यांवरील रंगाचे हट्टी डाग घालवण्यासाठी घरच्या घरीच काही पदार्थांचा वापर करून एक जादुई सोल्युशन तयार करणार आहोत. ज्याचा वापर करून अगदी मिनिटभरात तुम्ही कपड्यांवरील रंग अगदी सहजपद्धतीने काढू शकता. या सोल्युशनचा वापर केल्याने कपड्यांवरील रंग काढण्यासाठी तुम्हाला फारशी मेहेनत देखील घ्यावी लागणार नाही. 

साहित्य :- 

१. बेकिंग सोडा - २ टेबलस्पून 
२. मीठ - १ टेबलस्पून 
३. शाम्पू - १ टेबलस्पून 
४. लिंबाचा रस - २ ते ३ टेबलस्पून 
५. पाणी - गरजेनुसार

बॉडी शेपनुसार करा कुर्त्यांची निवड! दिसाल सुंदर, स्मार्ट आणि आकर्षक-पाहा तुम्हाला कोणता कुर्ता छान दिसेल...

कृती :- 

१. सर्वात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये बेकिंग सोडा, मीठ, शाम्पू, लिंबाचा रस असे सगळे जिन्नस एकत्रित घ्यावेत. 
२. त्यानंतर या मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून पेस्ट मध्यम कंन्सिस्टंसीची करून घ्यावी. 
३. आता ही पेस्ट तयार आहे. कपड्यांवरील रंगांचे डाग काढण्यासाठी आपण या पेस्टचा वापर करु शकता. 

ब्रेडचे ‘हे’ ६ पदार्थ म्हणजे मेजवानीच! नाश्ता ते स्वीट डिश, ब्रेड है मुमकीन है!

नाजूक आरी वर्क केलेले महागडे ब्लाऊज कपाटांत ठेवताना लक्षात ठेवा ५ टिप्स - चमक राहील कायम, खराब होणार नाहीत...

या पेस्टचा वापर कसा करावा ? 

१. सर्वात आधी कपड्यांवर जिथे रंग लागला आहे त्या भागावर ही तयार पेस्ट लावून घ्यावी. 
२. त्यानंतर ब्रश किंवा हलक्या हाताने चोळून रंग काढून घ्यावा. 
३. मग हे कपडे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. 
४. सगळ्यांत शेवटी आपण जसे नेहमीप्रमाणे कपडे धुतो तसे डिटर्जंट किंवा साबणाचा वापर करून पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यावेत. 

या जादुई पेस्टमध्ये असणारा बेकिंग सोडा, लिंबाचा रस यामुळे कपड्यांवरील रंगांचे हट्टी डाग सहजपणे निघण्यास मदत होते.

Web Title: Remove Holi Colour Stains From White Clothes With This Homemade Paste How To Remove Holi Color Stains From White Clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.