स्वयंपाकघर स्वच्छ असले की काम करायलाही उत्साह येतो, पण रोजच्या वापरामुळे गॅसचे बर्नर काळेकुट्ट आणि चिकट झाले की मात्र स्वयंपाकघरात काम करणे नकोसे वाटते. अनेकदा या बर्नरची छिद्रे घाणीमुळे बंद होतात, ज्यामुळे गॅसची ज्योत निळी न राहता पिवळी येते आणि गॅस जास्त खर्च होतो. स्वयंपाकाचा गॅस रोज वापरल्यामुळे त्याचे बर्नर हळूहळू काळे पडतात आणि त्यात अन्नाचे कण किंवा काजळी साचून छिद्रे बंद होतात. अशावेळी गॅसची फ्लेम मंद होते आणि गॅसही फार मोठ्या प्रमाणांत वाया जातो(how to clean gas burner at home).
स्वयंपाकघरात रोज वापरल्या जाणाऱ्या गॅस बर्नरवर तेलाचे डाग, अन्नपदार्थ आणि धुरामुळे काळी काजळी जमा होते. त्यामुळे बर्नर केवळ दिसायला खराब वाटत नाही तर गॅसचा फ्लोही नीट राहत नाही. महागडी केमिकल क्लिनर वापरण्यापेक्षा घरात सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंनी गॅस बर्नर स्वच्छ (remove black stains from gas burner) करता येतो. योग्य पद्धतीने आणि नियमितपणे स्वच्छता केल्यास काळेकुट्ट गॅस बर्नर पुन्हा नव्यासारखा चमकू शकतो. तासंतास घासूनही गॅस बर्नर नव्यासारखे स्वच्छ होत नाहीत...मग काळजी करू नका! काही असे सोपे आणि 'मॅजिकल' घरगुती उपाय आहेत, ज्याच्या मदतीने तुमचे काळेकुट्ट बर्नर अगदी नवीन विकत (clean gas burner naturally) आणल्यासारखे चमकू लागतील, तेही जास्त मेहनत न घेता... यासाठी नेमकं काय करायचं ते पाहूयात...
गॅस बर्नर होतील मिनिटभरात नव्यासारखे स्वच्छ...
१. लिंबू आणि गरम पाणी :- लिंबातील सायट्रिक ॲसिड गॅस बर्नरवरील काजळी आणि चिकटपणा काढून टाकण्यास मदत करते. गरम पाण्यात २ लिंबांचा रस आणि लिंबाची टरफले टाका. यात बर्नर २ तास भिजवून ठेवा. त्यानंतर डिशवॉश जेलने थोडे घासले की बर्नर चमकू लागतील.
२. इनोचा वापर :- बर्नरवर साचलेली घट्ट काजळी काढण्यासाठी 'इनो' अत्यंत उपयुक्त ठरतो. एका वाटीत पाणी घेऊन त्यात एक पाकीट इनो घाला. त्यात बर्नर १५ ते २० मिनिटे ठेवा. इनोच्या रिॲक्शनमुळे छिद्रांमधील घाण आपोआप सैल होते. त्यानंतर ब्रशने घासून स्वच्छ करा.
३. व्हिनेगर आणि बेकिंग सोडा :- हा उपाय सर्वात असरदार आणि फायदेशीर मानला जातो. एका भांड्यात इतके पाणी घ्या की त्यात बर्नर पूर्णपणे बुडतील. त्यात २ ते ३ चमचे बेकिंग सोडा आणि अर्धी वाटी व्हिनेगर घाला. रात्रभर किंवा किमान ३ ते ४ तास बर्नर त्यात भिजत ठेवा. त्यानंतर जुन्या टूथब्रशने थोडे घासून स्वच्छ करा.
४. चिंचेचे पाणी :- बर्नर जर तांब्या - पितळेचे असतील, तर चिंचेचे पाणी वापरणे फायदेशीर ठरते. गरम पाण्यात थोडी चिंच भिजत घाला. त्या पाण्यात बर्नर १ तास ठेवा. चिंचेच्या आंबटपणामुळे बर्नरचा काळपटपणा निघून त्याला सोन्यासारखी चमक येईल.
अर्धा टोमटो-आल्याचा तुकडा, उंदरांना पळवण्याचा घरगुती उपाय-होईल कायमचा बंदोबस्त...
५. बेकिंग सोडा आणि लिंबू :- बर्नरवर बेकिंग सोडा भुरभुरून त्यावर लिंबाचा रस पिळा. १५ ते २० मिनिटे तसेच ठेवा. नंतर स्क्रबरने घासून पाण्याने स्वच्छ धुवा. काजळी सहज निघून जाते.
६. मीठ आणि लिंबाची साल :- लिंबाच्या सालीवर मीठ घेऊन बर्नरवर घासा. नैसर्गिकरीत्या काळी काजळी कमी होते आणि बर्नरला चमक येते.
७. गरम पाणी आणि लिक्विड डिटर्जंट :- जर बर्नर जास्त खराब नसतील, तर हा साधा उपाय फायदेशीर ठरतो. कडक गरम पाण्यात कपडे धुण्याची पावडर किंवा भांडी घासण्याचे लिक्विड घालून बर्नर अर्धा तास भिजत ठेवा. यामुळे तेलकटपणा सहज निघून जातो.
