Join us  

Raksha Bandhan 2022 : याला म्हणतात डोकं! रक्षाबंधनाला फक्त ८० रुपयांत ६ बहिणींना देणार गिफ्ट, भावानं लढवली शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 1:22 PM

Raksha Bandhan 2022 : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये एक भाऊ रक्षाबंधनापूर्वी पैसे मोजायला बसला आहे.

रक्षाबंधन (Raksha Bandhan 2022) हा भावा-बहिणीच्या नात्यातील प्रेम वाढवणारा सण. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर संरक्षक धागा म्हणजेच राखी बांधते आणि भाऊ देखील आपल्या बहिणीची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. राखी बांधताना बहिणी भावांना भरभरून मिठाया भरवतात आणि भावांकडून चांगलेच लाड करून घेतात. (Brother made such budget by writing on chit settled 6 sisters)

अनेकवेळा असे घडते की एक भाऊ आणि बहिणी खूप असतात. त्यामुळे भावाला  खिसा मोकळा करावाच लागतो. इतकेच नाही तर काही लोकांच्या मानलेल्या बहिणीही असतात, ज्यांना लोक सख्ख्या बहिणीप्रमाणे मानतात आणि त्यांना भेटवस्तू आणि पैसेही देतात. (Brother made such budget by writing on chit settled 6 sisters in 80 rupees only)

फक्त सख्या बहिणींनाच नाही तर शेजारच्या, कॉलेजमधल्या, ट्यूशन आणि ऑफिसमधल्या बहिणींकडून मुलं राख्या बांधून घेतात. राखी बांधायला मुलींना खूप मजा येत  असली तरी मुलांना मात्र बहिणींना काय नवीन गिफ्ट द्यायचं याचं टेंशन असतं. यावर डोकं लावून या मुलानं ६ बहिणींना कमी खर्चात गिफ्ट देण्याचा फंडा शोधून काढला आहे. त्यामुळेच हा चर्चेचा विषय ठरत आहे.  

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये एक भाऊ रक्षाबंधनापूर्वी पैसे मोजायला बसला आहे. त्याने एका पानावर आपल्या सर्व बहिणींची यादी तयार केली आणि कोणाला काय द्यायचे याचा विचार केला. या चिटमध्ये तुम्ही पाहू शकता की त्या व्यक्तीने एकूण 80 रुपये मोजले आणि विचार केला की कोणाला किती पैसे द्यावे लागतील.

नशिबच! ७० वर्षीय महिलेनं दिला गोंडस बाळाला जन्म; लग्नानंतर ५४ वर्षांनी हलला पाळला

प्रथम त्यानं आत्त्याच्या मुलीला 11 रुपये रोख देणार असल्याचे लिहिले त्यानंतर १० रूपयांची डेरी मिल्क मावशीच्या मुलीला देणार. त्यानंतर शाळेतल्या बहिणीला २१ रूपये आणि ट्यूशनच्या बहिणीला  रोख ११ रूपये आणि ५ रूपये देणार असं ठरवलं. 

भावाला मिळाली बहिणीची माया! २ वर्षांपासून टिंडरवर शोधत होता बहिण, एक सोडून दोन मिळाल्या

इतकंच नाही तर त्यानं ५ रुपयांची चार पर्क चॉकलेट्सही ठेवली आहेत, ज्यामध्ये कोणी जास्तीची बहीण आली तर तो त्यांना हे चॉकलेट्स देईल. शेवटी त्याने आपल्या बहिणीचे नाव लिहिले आणि तिला प्रत्येकी एक रुपयाच्या दोन इक्लेअर टॉफी देण्याचं ठरवलं. या भावाचं रक्षाबंधनाचं नियोजन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. इन्स्टाग्रामवर 12 दशलक्षाहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया