Join us

गरम तव्यावर ओतले १ रुपयाचे शाम्पूचे सॅशे, पाहा कमाल- तवा कसा काय चमकायला लागला नव्यासारखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2024 10:05 IST

Put Shampoo On Pan and See the Shocking Results : गंज लागलेला तवाही झटक्यात स्वच्छ होतो; फक्त शाम्पूचा वापर 'असा' करा

लोखंडी तवा प्रत्येक घरात असतो. पोळ्या - भाकरीसाठी आपण तव्याचा वापर करतो (Cleaning Tips). तसेच थालीपीठ, डोसे, उरलेली भाजी किंवा फोडणीचा भातही आपण त्यात करतो (Kitchen Tips). हे पदार्थ केल्याने लोखंडी तवा लवकर काळपट पडतो. घासूनही बऱ्याचदा तव्याचा काळपटपणा निघत नाही (Social Viral). ज्यामुळे तव्यावर काळा थर तयार होतो.

हे थर जर खरवडून काढून तवा स्वच्छ केला नाही तर पोळ्या भाकरी डागतात. जर तवा घासूनही स्वच्छ होत नसेल तर, '१' रुपयाचा शाम्पूचा वापर करून पाहा. दगडाने किंवा स्क्रबरने न घासता अगदी काही मिनिटात तवा स्वच्छ होईल. या एका युक्तीमुळे काळपट पडलेला तवा स्वच्छ करणं सोपं होईल(Put Shampoo On Pan and See the Shocking Results).

तवा स्वच्छ करण्यासाठी शाम्पूचा वापर कसा करावा?

काळपट पडलेला तवा स्वच्छ करण्यासाठी शाम्पूचा वापर करा. घासूनही जर तवा स्वच्छ होत असेल तर, या युक्तीचा वापर करून पाहा.

जास्वंदाच्या झाडाला फुलंच येत नाही? कांद्याच्या सालीचा करा 'असा' वापर; झाड बहरेल फुलांनी

सर्वात आधी तवा गरम करण्यासाठी ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्यावर एक रुपयांचा शाम्पू ओतून चमच्याने पसरवा. शाम्पूमध्ये एक चमचा बेकिंग सोडा मिक्स करा. नंतर त्यात एक कप पाणी ओता. २ मिनिटानंतर गॅस बंद करा. त्यात एक चमचा लिंबाचा रस ओतून मिक्स करा, आणि लिंबाच्या सालीने तवा घासून काढा.

लिंबाच्या रसाने घासल्यानंतर स्क्रबरने घासा. यामुळे काळपट थर निघून जाईल, आणि तवा काही मिनिटात स्वच्छ होईल.

टॅग्स :किचन टिप्सस्वच्छता टिप्स