Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > मैसूर सिल्क साडी घेण्यासाठी बायका इतक्या का वेड्या झाल्या आहेत? पहाटे ४ वाजल्यापासून दुकानाबाहेर लांबचलांब रांग...

मैसूर सिल्क साडी घेण्यासाठी बायका इतक्या का वेड्या झाल्या आहेत? पहाटे ४ वाजल्यापासून दुकानाबाहेर लांबचलांब रांग...

public queued up at 4 am to buy mysore silk sarees : mysore silk saree video goes viral : women waiting in queue for silk sarees : कर्नाटकात मैसूर सिल्क साडीच्या खरेदीसाठी महिलांची गर्दी, पैसे असून साडी मिळणं मुश्किल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2026 18:18 IST2026-01-20T17:21:27+5:302026-01-20T18:18:46+5:30

public queued up at 4 am to buy mysore silk sarees : mysore silk saree video goes viral : women waiting in queue for silk sarees : कर्नाटकात मैसूर सिल्क साडीच्या खरेदीसाठी महिलांची गर्दी, पैसे असून साडी मिळणं मुश्किल!

public queued up at 4 am to buy mysore silk sarees mysore silk saree video goes viral women waiting in queue for silk sarees | मैसूर सिल्क साडी घेण्यासाठी बायका इतक्या का वेड्या झाल्या आहेत? पहाटे ४ वाजल्यापासून दुकानाबाहेर लांबचलांब रांग...

मैसूर सिल्क साडी घेण्यासाठी बायका इतक्या का वेड्या झाल्या आहेत? पहाटे ४ वाजल्यापासून दुकानाबाहेर लांबचलांब रांग...

साडी म्हणजे की महिलांचा जीव की प्राण! महिलांचं साड्यांवरील प्रेम काही नवीन नाही, पण जेव्हा सिल्कची साडी आणि तीही अस्सल मैसूर सिल्क असेल तर बायका रांगा लावणार नाही तर काय! मैसूर सिल्क घ्यायला बायकांनी अशा लांबचलांब रांगा लावल्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आणि प्रश्न पडला की साडीसाठी इतका जीव का काढत आहेत या बायका? पहाटे ४ वाजल्यापासून महिला साडीच्या दुकानाबाहेर रांगा ( mysore silk saree video goes viral) लावून बसल्या आहेत. त्यांना टोकन देण्यात येत आहेत, आणि तरी काहींना ती साडी आपल्याला मिळेल की नाही याचं टेंशन आलेलं आहे.

लग्नानंतर वर्षभरात नवराबायको जाडजूड का होतात? सुखी संसाराचे 'साईड इफेक्ट', ‘या’ कारणांमुळे बदलतो शरीराचा घेर...

कर्नाटक सिल्क इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन (KSIC) च्या शोरूमबाहेर या रांगा लागल्या. बरं या साड्या स्वस्त आहे की सेल सुरु आहे का, तर तसंही काही नाही. साड्या प्रचंड महागड आहेत. तब्बल  २३,००० ते चक्क अडीच लाख रुपये अशी या साड्यांची रेंज आहे. मग तरी इतकी गर्दी का?
आणि विशेष म्हणजे खिशात तुमच्या कितीही पैसे असोत एका टोकनवर एकाच साडीची (women waiting in queue for silk sarees) विक्री होते आहे. जास्त साड्या देण्यात येत नाही.

राजवाडी कड्यांचे डिझाइन्स पाहा, वाटेल कधी एकदा हातात घालावे! महाराणींसारखे दिसतील हात-कडे शोभतील सर्व ड्रेसेसवर...

प्रेशर कुकरचा स्फोट होण्यापूर्वी हमखास दिसतात ६ लक्षणं,  ९०% लोक करतात एक चूक...

आता हे सारं वाचून कुणालाही प्रश्न पडेल की असं या साडीत काय आहे, इतक्या का या बायका वेड्या झाल्या?
तर त्याचं कारण असं की अस्सल मैसूर सिल्क मिळणंच आता दुरापास्त झालं आहे. मागणी जास्त आणि तुलनेनं पुरवठा कमी. कर्नाटक सिल्क इंडस्ट्रीज़ कॉर्पोरेशन या साड्या तयार करते, त्या हातमागावर तयार होतात. आता हातमागावर काम करणारे कुशल विणकरही कमी झालेले आहेत. त्यामुळे साड्यांचं उत्पादन कमी. आणि दक्षिण भारतात विशेषत: कर्नाटकात महिलांकडे पिंढ्यांपढ्या मैसूर साड्या घेण्याची त्या परस्परांना देण्याची, जपण्याची परंपरा आहे. ती साडी केवळ साडी नाही तर शुभप्रसंगी अंगावर मिरवण्याचं पारंपरिक वस्त्र आहे असं मानलं जातं.

विशेष म्हणजे या साडीला मैसूरमध्ये जीआय टॅग मिळालेला आहे त्यामुळे तिच्या अस्सलतेची खात्री आहे. बाहेर कृत्रिम सिल्कच्या साड्या मिळून फसवणूकीचा धोकाही वाढतो. हे सारं टाळायचं म्हणून आणि आपण मोजत असलेल्या पैशातून अस्सल पारंपरिक हातमाग मैसूर सिल्क साडीच घ्यायची म्हणून महिला रांगा लावत आहेत. साडीप्रेम तर त्यात आहेच पण परंपरेतून आलेलं देशी वस्त्र जपण्याचं वेडही दिसतंय.!


Web Title : मैसूर सिल्क साड़ी का क्रेज: कर्नाटक में हजारों महिलाएं सुबह से पहले कतार में!

Web Summary : कर्नाटक में महिलाएं 2.5 लाख रुपये तक की मैसूर सिल्क साड़ियों के लिए सुबह से पहले कतार में लग गईं। परंपरा और गुणवत्ता से प्रेरित होकर, उन्होंने उत्सुकता से टोकन का इंतजार किया, जो उच्च कीमतों के बावजूद स्थायी साड़ी प्रेम को दर्शाता है।

Web Title : Mysore Silk Saree Craze: Thousands Queue Before Dawn in Karnataka!

Web Summary : Karnataka women lined up before dawn for Mysore silk sarees costing up to ₹2.5 lakhs. Driven by tradition and quality, they eagerly awaited tokens, showcasing enduring saree love despite high prices.