Join us

‘त्यानं’ तिला प्रपोज करताच निसर्गही खवळला-उसळला ज्वालामुखी, हादरली धरती! पाहा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2025 17:05 IST

Proposal video went right, a volcano erupted, the earth shook! Watch the viral video : मुलीला लग्नासाठी मुलाने विचारताच निसर्गाने दाखवली त्याची किमया. व्हिडिओ झाला चांगलाच व्हायरल.

'She said YES!!' असे अनेक व्हिडिओ आजकाल इस्टाग्रामवर व्हायरल होतात. कपल्स त्यांचे आनंदाचे क्षण सोशल मिडियामार्फत जगाशी शेअर करतात. प्रपोज करणे आता नात्यातील एक महत्वाचा भाग झाले आहे. (Proposal video went right, a volcano erupted, the earth shook! Watch the viral video)लोकं फार कष्ट करुन प्रपोजल प्लॅन वगैरे करतात. त्यासाठी बराच खर्चही करतात आणि वेळही तेवढाच देतात. वेगवेगळ्या पद्धतीने प्रपोज केले जाते. सामान्यतः प्रपोजलसाठी लोक समुद्रकिनारे, पर्वत किंवा सुंदर ठिकाणांची निवड करतात. जिथे त्यांची पहिल्यांदा भेट झाली किंवा पहिली डेट जिथे झाली अशा ठिकाणी जाऊन प्रपोज करतात. 

surprise proposal ही एक नवी आणि फार लोकप्रिय अशी संकल्पना आहे. समोरचा हो म्हणेल का नाही म्हणेल याचा विचार न करता अचानक लग्नाची मागणी घालतात.  त्यावेळी समोरच्याचे हावभाव कसे असतात हे टिपण्यासाठी या प्रपोजल्सचे व्हिडिओही केले जातात. सध्या असाच एक व्हिडिओ फार व्हायरल झाला आहे. मुलाने त्याच्या प्रियसीला प्रपोज करण्यासाठी जागा जरा इतरांपेक्षा हटके निवडली आणि निसर्गानेही त्यांच्या लग्नाला अनुमती दर्शवली. 

अमेरिकेमध्ये ग्वाटेमाला नावाची एक जागा आहे. ही जागा ज्वालामुखीसाठी प्रसिद्ध आहे. तिथे अधून-मधून ज्वालामुखीचा उद्रेक पाहायला मिळतो. फुएगो असे या ज्वालामुखीचे नाव असून तो भयंकर उद्रेकांसाठी आणि त्याच्या भव्यतेसाठी ओळखला जातो. त्या ठिकाणी फिरायला गेले असताना मुलाने फोटो काढण्याच्या बहाण्याने मुलीला एका गुडघ्यावर बसून पद्धतशीर मागणी घातली आणि त्याच वेळी ज्वालामुखीचा उद्रेकही झाला. त्याचा व्हिडिओ त्यामुळे फार सुंदरही आला आणि गाजलाही. 

सोशल मिडियावर निसर्गानेही संमती दर्शवली असे अनेकांनी लिहिले. तर अनेकांनी विनोदी कमेंट्स करत चर्चा रंगवली. देव सांगतो आहे लग्न करु नकोस, ज्वालामुखी सारखा भांडणांचाही उद्रेक होईल याचा संकेत निसर्ग देत आहे अशा विविध कमेंट्स लोकांनी केल्या आहेत.   

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाज्वालामुखीलग्न