लेकरु दवाखान्यात असेल तर आईच्या काळजाचं पाणी पाणी होतं. ना अन्न गोड लागतं ना कुठं मन रमतं. आई सेलिब्रिटी असली तरी आणि खूप पैसा असला तरी लेकराची वेदना सहन करणंच अवघड. प्रियांका चोप्रा तीच वेदना सांगते. तिला सरोगसीने मालती मेरी नावाचं बाळ झालं. पण जन्मपासून मालतीच्या मागे आजारपण होतं. सतत दवाखाना. प्रियांका सांगते त्या अवघड दिवसांची गोष्ट. म्हणते कितीदा भीती वाटली होती की आपलं हे लेकरु आपण गमावणार तर नाही(Priyanka Chopra reveals she was close to losing daughter Malti Marie many times, says ‘every time she smiles).
हॉलिवूडमध्ये काम ते तिसाव्या वर्षी एग्ज फ्रिजिंग करण्यापर्यंत असे अनेक साहसी आणि जगावेगळे निर्णय तिनं घेतले. जरासुद्धा न डगमगता अतिशय मोकळेपणाने तिनं आपल्या आयुष्यातल्या गोष्टी सांगितल्या. सध्या प्रियांका तिच्या ‘सिटाडेल’ या सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजच्या निमित्ताने प्रियांका मुलाखती देत आहे, ज्यामध्ये ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारलेल्या प्रश्नांची बेधडक उत्तरंही देत आहे.
प्रियांका चोप्रा ठरली ब्रिटिश वोग मासिकावर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री...
प्रियांका चोप्राने तिसाव्या वर्षीच केले होते एग्ज फ्रिजिंग! ते नेमके काय असते?
एवढूशा लेकानं आईला वाढला नाश्ता.. करिना कपूरची व्हायरल पोस्ट, जेहची तारीफ करत म्हणाली...
प्रियांकाने आपल्या सरोगसीचा केला खुलासा...
प्रियांका एका मुलाखतीदरम्यान आपल्या सरोगसीच्या निर्णयावर देखील अतिशय खुलेपणाने माध्यमांसमोर मनातले बोलली आहे. प्रियांकाने सांगितले की तिने सरोगसी का निवडली आणि त्यामुळे तिला सरोगसीबाबत अनेक टोमण्यांचा सामना करावा लागला होता. ती म्हणते, 'मालतीचा जन्म झाला तेव्हा मी ऑपरेटिंग रूममध्ये होते. ती माझ्या हाताच्या तळव्यापेक्षा लहान होती. तिला इंटेंसिव केअरमध्ये ठेवावं लागलं. नर्सेस तिची काळजी घेत होत्या त्या कोणत्याही देवापेक्षा कमी नाहीत. प्रियांकाने सरोगसी निवडण्यामागचे कारणही सांगितले. अभिनेत्री म्हणाली की मला काही शारीरिक समस्या आहेत आणि त्यामुळेच मी स्वतः मुलाला जन्म देऊ शकत नाही. त्यामुळे बाळाचा विचार केला तर सरोगसी करणे आवश्यक होते. मी स्वतःला भाग्यवान समजते की मला ही संधी मिळाली आणि मी माझ्या सरोगेटचीही आभारी आहे ज्यांनी सहा महिने आमच्या या अनमोल लेकीची काळजी घेतली.