Join us  

बाबौ! डिलिव्हरीसाठी आलेल्या महिलेच्या पोटाचा आकार पाहून घाबरले डॉक्टर; ऑपरेशनच्यावेळी घडलं असं..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 6:25 PM

Pregnant woman shows unique baby bump : मिशेलनं ऑपरेशनचे ३६ तास खूप कठीण असल्याचं सांगितलं. कठीण प्रसंगांचा सामना करत तिनं ३ बाळांना जन्म दिला.

आई मुलाचं नातं जगातल्या कोणत्याही नात्यापेक्षा अनमोल असतं. प्रत्येक आई ही अडचणींचा सामना करत ९ महिने आपल्या बाळाला पोटात वाढवते. सोशल मीडियावर अशाच एका आईचा फोटो व्हायरल होत आहे. या महिलेनं स्वत: आपल्या बेबी बंप्सचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Pregnant woman shows unique baby bump) 

या फोटोवर लोक लाईक्ससह कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. या महिलेचे बेबी बंम्प्स पाहून सगळेचजण अवाक् झाले आहेत. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की या महिलेला किती त्रासदायक प्रसंगांचा सामना करावा लागला असणार. सोशल मीडियावर ज्या महिलेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे तिचं नवा मिशेल मेअर मोर्सी असं आहे.

जवळपास ३५ महिने तिनं आपल्या बाळांना गर्भात वाढवलं. ऑपरेशननंतर ३ मुलांना जन्म दिला. मिशेलच्या  ३ लहान मुलांची नाव चाल्र्स, थियोडोर आणि गेब्रियल अशी आहेत. या महिलेनं आधीसुद्धा २ मुलांना जन्म दिला होता. फोटोमध्ये आईजवळ बसलेली ३ मुलं तुम्ही पाहू शकता. 

या महिलेचे जवळपास २ लाखांपेक्षा  जास्त फॉलोअर्स सोशल मीडियावर आहेत. बाळाला जन्म दिल्यानंतर तिनं आपल्या  पोटाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. साधारणपणे प्रेग्नंसीच्यावेळी पोट खालच्या बाजूनं वाढू लागतं. पण  मिशेलचं पोट समोरच्या बाजूनं वाढत होतं. मिशेलनं ऑपरेशनच्या एक दिवस आधी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्या व्हिडीओमध्ये गाऊनमध्ये उभं राहून तिनं आपले बेबी बंम्प पकडले होते.

मिशेलनं ऑपरेशनचे ३६ तास खूप कठीण असल्याचं सांगितलं. कठीण प्रसंगांचा सामना करत तिनं ३ बाळांना जन्म दिला.आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून जगभरात व्हायरल होत आहे. लोकांनी कौतुकास्पद कमेंट्सचा वर्षाव या व्हिडीओवर केला आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियागर्भवती महिलाप्रेग्नंसी