Join us  

पोलीस कॉन्स्टेबलच्या बहिणीची लग्नपत्रिका व्हायरल; लग्नात नक्की या पण, मतदान..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2024 2:10 PM

Policeman's sister's wedding card went viral made this unique appeal to the people coming to the wedding : लग्नाला नक्कीच या म्हणण्याऐवजी केले अनोखे आवाहन; मतदानाविषयी केली जागरूकता

एकीकडे लोकसभेची रणधुमाळी तर, दुसरीकडे लग्नसराईचा माहौल रंगला आहे (Wedding Season). उन्हाळा सुरु झाला की, अनेकांच्या घरात सनई चौघडेचे सूर घुमू लागतात (Loksabha 2024). आजकाल लोक लग्नात हटके गोष्ट करून व्हायरल होतात. काहींची लग्नातील एन्ट्री लक्षवेधी ठरते. तर काहींच्या लग्नातील मेन्यू किंवा लग्नपत्रिका व्हायरल होतात. अशीच एक लग्नपत्रिका लोकांचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरली आहे (Social Viral).

एकीकडे मतदान करण्यासाठी जागरूकता निर्माण व्हावी म्हणून, जिल्हा प्रशासन विविध प्रकारचे प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे पोलीस कर्मचाऱ्याच्या बहिणीने निवडणुकाबाबत लोकांमध्ये गांभीर्यता निर्माण व्हावी म्हणून, लग्नपत्रिकेत एक विशेष संदेश दिला आहे. लग्नपत्रिका व्हायरल होण्यामागचं कारण काय? यातून मतदान करण्यासाठी लोकांना प्रेरणा का मिळत आहे? पाहूयात(Policeman's sister's wedding card went viral made this unique appeal to the people coming to the wedding).

घरात एसी नाही? टेन्शन कशाला? फॅनच्या हवेमुळेही खोली होईल थंड- विजेची देखील होईल बचत

व्हायरल लग्नपत्रिकेची गोष्ट

मध्यप्रदेशातील दमोह येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. जिथे लग्नापेक्षा लग्नपत्रिकाच चर्चेत आली आहे. हटा पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल मनीष सेन यांनी आपल्या बहिणीच्या लग्नपत्रिकेत लोकांना विशेष आवाहन केले आहे. सर्व लोकांनी मतदान नक्की करावे असे आवाहन त्यात करण्यात आले आहे.

राष्ट्रीय पुरस्कार ते सर्वात प्रभावशाली १०० जणांच्या यादीत मान; आलिया भटच्या यशाचं सिक्रेट

मनीष यांची बहीण आरतीचे लग्न २३ एप्रिल रोजी आहे. तसेच त्याठिकाणी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पोलीस कॉन्स्टेबल मनीष सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ही खरी आयडिया माझी बहिण आरतीची आहे. तिनेच लग्नपत्रिकेत मतदानाविषयी जागरूकता व्हावी म्हणून, एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यात तिने, 'मतदान करणे म्हणजे फक्त बटण दाबणे असे होत नाही. तर तुमच्या एका मताने तुम्ही तुमचे सरकार निवडतात. मतदान अवश्य करा.'

सध्या ही लग्नपत्रिका ज्या ज्या घरात पोहचत आहे, त्या त्या घरातील सदस्यांकडून कौतुक करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हटा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शत्रुघ्न दुबे यांनीही या अनोख्या लग्नपत्रिकेचे कौतुक केले आहे.

टॅग्स :लोकसभासोशल व्हायरलसोशल मीडिया