राष्ट्रीय पुरस्कार ते सर्वात प्रभावशाली १०० जणांच्या यादीत मान; आलिया भटच्या यशाचं सिक्रेट

Published:April 18, 2024 01:38 PM2024-04-18T13:38:57+5:302024-04-18T13:49:22+5:30

Alia Bhatt featured on Time's 100 Most Influential list : आलिया भट्टचे नाव टाइम मॅगझीनच्या १०० प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत; चाहत्यांकडून कौतुक

राष्ट्रीय पुरस्कार ते सर्वात प्रभावशाली १०० जणांच्या यादीत मान; आलिया भटच्या यशाचं सिक्रेट

बॉलीवूडसह हॉलीवूड गाजवणारी दमदार अभिनेत्री आलिया भटने (Alia Bhatt) अल्पावधीतच आकाशाला गवसणी घातली. 'स्टूडेण्ट ऑफ द इयर' या चित्रपटापासून झालेला तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे (Bollywood Actress). फक्त सौंदर्यचं नसून तिने अभिनयाच्या जोरावर आपला गड उभा केला आहे. तिचा नुकताच २०२४ मधील सर्वात प्रभावशाली १०० जणांच्या यादीत समावेश करण्यात आलं असून, या नावाची यादी प्रसिद्ध टाइम्स मासिकानं शेअर केली आहे. त्यामुळे चाहत्यांकडून आलियाचं तोंड भरून कौतुक करण्यात येत आहे(Alia Bhatt featured on Time's 100 Most Influential list).

राष्ट्रीय पुरस्कार ते सर्वात प्रभावशाली १०० जणांच्या यादीत मान; आलिया भटच्या यशाचं सिक्रेट

आलिया भट. एकेकाळी तिची ओळख चुलबुली सोजवळ अभिनेत्री म्हणून होती. पण तिने अभिनयाच्या आणि चित्रपट निवडीच्या जोरावर आपली ओळख दमदार केली.

राष्ट्रीय पुरस्कार ते सर्वात प्रभावशाली १०० जणांच्या यादीत मान; आलिया भटच्या यशाचं सिक्रेट

'स्टूडेण्ट ऑफ द इयर', 'गली बॉय', 'रॉकी और रानी की प्रेम कहानी', '२ स्टेट्स', 'हायवे' यासह अनेक चित्रपटांमधून तिने स्वतःला सिद्ध केलं आहे.

राष्ट्रीय पुरस्कार ते सर्वात प्रभावशाली १०० जणांच्या यादीत मान; आलिया भटच्या यशाचं सिक्रेट

मुख्य म्हणजे 'आरआरआर' या साऊथ चित्रपटात तिने लहानशी भूमिका साकरली होती, पण तिची ही भूमिका लोकांच्या कायम आठवणीत राहील अशी होती.

राष्ट्रीय पुरस्कार ते सर्वात प्रभावशाली १०० जणांच्या यादीत मान; आलिया भटच्या यशाचं सिक्रेट

'राझी' मधली सहमत सय्यद असो किंवा 'गंगुबाई काठीयावाडी' मधली गंगुबाई. तिने प्रत्येक पात्रात जीव ओतून स्वतःला कायम सिद्ध केलं आहे.

राष्ट्रीय पुरस्कार ते सर्वात प्रभावशाली १०० जणांच्या यादीत मान; आलिया भटच्या यशाचं सिक्रेट

विशेष म्हणजे 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट अभिनयाकरिता पुरस्कार मिळाला होता. तेव्हा पुरस्कारापेक्षा तिने नेसलेल्या साडीची प्रचंड चर्चा झाली होती. कारण तिने या प्रतिष्ठित सोहळ्यासाठी लग्नाची साडी पुन्हा नेसली होती. यामुळे आलियाचे किती साधं राहणीमान आहे, हे दिसून आले.

राष्ट्रीय पुरस्कार ते सर्वात प्रभावशाली १०० जणांच्या यादीत मान; आलिया भटच्या यशाचं सिक्रेट

फक्त बॉलीवूड नाही तर, हॉलीवूडमध्ये देखील तिने आपला डेब्यू केला आहे. प्रेग्नंट असतानाचं आलियाने 'हार्ट ऑफ स्टोन' या हॉलीवूड चित्रपटाद्वारे प्रवेश केला तर खरा, पण हा चित्रपट प्रेक्षकांना भावला नसल्याचं दिसून आलं. यात तिने नकारात्मक भूमिका साकारली असून, तिची या चित्रपटात जादू अधिक चालली नसल्याचं बोललं जात आहे.

राष्ट्रीय पुरस्कार ते सर्वात प्रभावशाली १०० जणांच्या यादीत मान; आलिया भटच्या यशाचं सिक्रेट

फक्त बॉलीवूड आणि हॉलीवूड नसून, तिने ओटीटी विश्वातही आपली जादू चालवण्याचा प्रयत्न केला, आणि हा प्रयत्न यशस्वी ठरला. आलीयाचा 'डार्लिंग' हा चित्रपट ओटीटीवर बराच चालला. मुख्य म्हणजे तिने साकारलेली 'बदरूनिसा शेख' हे पात्र लोकांना भावलं.

राष्ट्रीय पुरस्कार ते सर्वात प्रभावशाली १०० जणांच्या यादीत मान; आलिया भटच्या यशाचं सिक्रेट

आलियाने आयुष्यात खूप काही कमावलं. पण तिच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा तिची मुलगी राहा ठरली. राहाच्या येण्याने तिला आईपण मिळालं असल्याचं ती अनेक मुलाखतींमध्ये सांगते. शिवाय मायलेकीची जोडी बऱ्याच ठिकाणी एकत्रही दिसते.

राष्ट्रीय पुरस्कार ते सर्वात प्रभावशाली १०० जणांच्या यादीत मान; आलिया भटच्या यशाचं सिक्रेट

आपली आवडती अभिनेत्री आलिया लवकरच ब्रम्हास्त्र २, लव्ह अँड वॉर आणि जिगरा या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, तिच्या आगामी चित्रपटासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.