Join us

उशा लवकर लूळ्या पडतात, कापूस सरकतो, गाठी होतात? ४ उपाय, उशा लवकर खराब होणार नाहीत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2025 14:24 IST

Pillows get dirty quickly, cotton slips? 4 solutions to prevent pillows from getting damaged quickly : उशी चांगली राहावी यासाठी करा हे उपाय. उशीचा कापूस कायम चांगला राहील.

काही रोजच्या वापराच्या गोष्टी असतात ज्यांची छान काळजी आपण घेत नाही. त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. जसे की उशी.  (Pillows get dirty quickly, cotton slips? 4 solutions to prevent pillows from getting damaged quickly)झोपताना अंगावर पांघरुण नसले तरी चालेल पण उशी मात्र हवी. काही जण झोपताना उशी घेत नाहीत मात्र असे फार कमी लोक असतात. इतरांना उशी शिवाय झोप लागत नाही. उशी वापरणे चांगले का वाईट असा विषय सतत चालू असतो. मात्र उशीची सवय अनेकांना लागलेली आहे त्यामुळे उशी घेतल्याशिवाय शांत झोप काही लागत नाही. उशीतही अनेक प्रकार आता आले आहेत मात्र कापसाच्या उशीला तोड नाही. 

कापसाच्या उशा काही काळा नंतर वाकड्या तिकड्या होतात. त्यावर झोपताना डोके व्यवस्थित राहत नाही. कारण उशी नीट काळजी न घेतल्यामुळे मोडते. (Pillows get dirty quickly, cotton slips? 4 solutions to prevent pillows from getting damaged quickly)उशी मोडते म्हणजे तिचा कापूस एका ठिकाणी साठतो. उशीचा आकार बदलतो आणि ती वापरताना आरामदायी वाटत नाही. त्यामुळे काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा आणि उशी खराब होण्यापासून वाचवा. 

१. उशी एकदा आणली की त्याकडे फार लक्ष आपण देत नाही. त्याची शिलाई निघालेली असली तरी ती बाजू फक्त वळवून ठेवतो. पण उशीची शिलाई खराब झाल्यामुळे उशी लवकर मोडते. त्यामुळे उशीला वेळोवेळी शिलाई घालायची. त्यात कापूस भरून घ्यायचा. 

२. उशी एकाच बाजूने कायम वापरायची नाही. असे केल्याने उशीचा कापूस एकाच बाजूने दाबला जातो. उशी कायम आलटून पालटून वापरायची. म्हणजे सपाट होत नाही छान फुगीर राहते. दर आठवड्याला बाजू बदलायची. 

३. अनेक जण उशीवर बसतात मात्र उशी ही बसण्याची गोष्ट नाही. खुर्चीवर ठेवायची वेगळी उशी मिळते बसायला तीच उशी वापरावी. झोपेच्या उशीवर बसल्याने उशीचा कापूस खराब होतो. त्या उशीवर बसतानाही आरामदायी वाटत नाही आणि झोपायलाही. त्यामुळे बसायची वेगळी उशी आणा ती जरा कडक असते. 

४. उशी वेळोवेळी वाळवायची. गाद्या उशा चादरी यांना उन दाखवण्याची पद्धत आपल्याकडे आहे. दुपारच्या कडक उन्हात या वस्तू वाळवायच्या. असे केल्याने दमटपणा ओलावा काही असेल तर तो जातो. उशी छान कडक होते. कापूस कुजत नाही. 

 

टॅग्स :गृह सजावटहोम रेमेडीसुंदर गृहनियोजन