ऑनलाइन फूड डिलिव्हरीमुळे जेवण मागवणं जितकं सोपं झालं आहे, तितक्याच वेगाने काही गैरप्रकारही वाढताना पाहायला मिळत आहे.(Zomato refund fraud) झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. काही ग्राहक AI चा चुकीच्या पद्धतीने वापर करुन रिफंड मागतात.(AI fake food complaints) ऑर्डर केलेल्या जेवणात किडे, माशा, केस किंवा खराब पदार्थ असल्याचे दाखवण्यासाठी AI- जनरेटेड फोटो वापरले जात असल्याचं त्यांनी सांगितलं. (online food delivery scam)
फ्लॉवरच्या भाजीला आईच्या हातासारखी चव येत नाही? शिजवताना ५ चुका टाळा, फ्लॉवर लागेल चविष्ट
दीपिंदर गोयल म्हणतात पूर्वी रिफंडसाठी ग्राहकांकडून मिळणाऱ्या तक्रारी बहुतेक वेळा खऱ्या असायच्या. पण गेल्या काही महिन्यांत अचानक अशा तक्रारींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळाली. जिथे फोटो खरे दिसतात पण त्यामागचं सत्य काही वेगळचं. काही प्रकरणांमध्ये तर AI च्या माध्यमातून केक फोडल्याचे, जेवण सांडल्याचे किंवा त्यात कीटक आहेत असे फोटो तयार करण्यात आले. ज्यातून ग्राहकांनी रिफंड क्लेम केला.
AI च्या वाढत्या वापरामुळे सर्वसामान्य माणसाला हे फोटो खरे की खोटे, हे ओळखणं कठीण होतं आहे. याचा थेट फटका फूड डिलिव्हरी कंपन्यांना आणि रेस्टॉरंट्सना बसतो आहे. चुकीच्या तक्रारींमुळे अनेक छोट्या रेस्टॉरंट्सना आर्थिक नुकसान सहन करावं लागतं, तर काही वेळा कर्मचाऱ्यांवरही संशय घेतला जातो.
यासाठी झोमॅटोने AI-आधारित फ्रॉड डिटेक्शन सिस्टिम अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. संशयास्पद तक्रारींचं बारकाईने विश्लेषण केलं जात असून वारंवार चुकीचे रिफंड क्लेम करणाऱ्या अकाउंट्सवर कारवाई केली जात आहे. गोयल यांनी स्पष्ट केलं की कंपनीचा उद्देश खऱ्या ग्राहकांना मदत करणं हा आहे पण फसवणूक सहन केली जाणार नाही.
पण यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. AI चा वापर सोयीसाठी व्हायला हवा की गैरफायद्यासाठी. तंत्रज्ञान जितकं शक्तिशाली आहे. तितकाच त्याचा गैरवापर होण्याची शक्यताही वाढते. ग्राहकांनीही जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. कारण अशा फसवणुकीमुळे भविष्यात खऱ्या तक्रारींवरही संशय घेतला जाऊ शकतो.
