Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > रातोरात बदललं पाकिस्तानच्या मंत्रीणबाईंचे रुप, बिफोर-आफ्टर फोटो पाहून जगभर चर्चा-हे घडलं कसं?

रातोरात बदललं पाकिस्तानच्या मंत्रीणबाईंचे रुप, बिफोर-आफ्टर फोटो पाहून जगभर चर्चा-हे घडलं कसं?

Pakistan Minister Marriyum Aurangzeb: पाकिस्तानी मंत्री मरियम औरंगजेब यांच्यातल्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत..(Pakistan minister Marriyum Aurangzeb going viral because of her transformation)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2026 19:36 IST2026-01-19T16:57:07+5:302026-01-19T19:36:24+5:30

Pakistan Minister Marriyum Aurangzeb: पाकिस्तानी मंत्री मरियम औरंगजेब यांच्यातल्या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत..(Pakistan minister Marriyum Aurangzeb going viral because of her transformation)

Pakistan minister Marriyum Aurangzeb going viral because of her transformation | रातोरात बदललं पाकिस्तानच्या मंत्रीणबाईंचे रुप, बिफोर-आफ्टर फोटो पाहून जगभर चर्चा-हे घडलं कसं?

रातोरात बदललं पाकिस्तानच्या मंत्रीणबाईंचे रुप, बिफोर-आफ्टर फोटो पाहून जगभर चर्चा-हे घडलं कसं?

Highlightsत्यांनी काहीही केलं असलं तरी त्या अतिशय सुंदर दिसत आहेत, यावर जवळपास सगळ्यांचच एकमत झालेलं असून काही जणांना त्या भारतीय अभिनेत्री दिया मिर्झा हिच्यासारख्याच सुंदर दिसत आहेत.  

सोशल मीडियावर रोजच काही तरी नवा ट्रेण्ड येत असतो आणि मग पुढचे काही दिवस त्याची सतत चर्चा हाेत असते. आता असंच काहीसं झालं आहे पाकिस्तानी मंत्री मरियम औरंगजेब यांच्याबाबत. ४५ वर्षांच्या मरियम त्यांच्या राजकीय निर्णयांवरून किंवा त्यांच्या विधानांवरून नेहमीच चर्चेत असतात. चर्चेत असणं हे त्यांच्यासाठी काही नविन नाही. पण सध्या मात्र त्या ज्या कारणावरून चर्चेत आहेत, ते कारण मात्र फारच वेगळं आणि नविन आहे. मरियम यांचा चेहरा तसा सगळ्यांनाच परिचित. पण मागच्या काही दिवसांत त्यांच्यामध्ये जणू जादू झाली असावी, असा बदल दिसून आला आणि सगळीकडे त्यांच्या सौंदर्याची चर्चा सुरू झाली. त्यांचे नवे व्हायरल फोटो खरोखरच अतिशय सुंदर असून हा बदल झाला कसा असा प्रश्न नेटिझन्सला पडला आहे.(Pakistan minister Marriyum Aurangzeb going viral because of her transformation)

 

कोण आहेत मरियम औरंगजेब?

मरियम औरंगजेब या सध्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या सूचना आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम पाहात आहेत. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नातवाच्या लग्नात मरियम यांनी नुकतीच उपस्थिती लावली. लग्नसमारंभ असल्याने त्या छान पारंपरिक वेशभुषेत नटून थटून आल्या होत्या.

संध्याकाळी हळदी- कुंकू, पण चेहरा डल दिसतो? घ्या उपाय- १० मिनिटांत मिळेल डायमंड फेशियलसारखा ग्लो

त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यामध्ये जो बदल जाणवला तो अनेकांना खूपच आवडला. त्यांच्या चेहऱ्याला अतिशय छान आकार आला असून फिचर्स खूपच शार्प झालेले आहेत. चेहऱ्यावर पुर्वी दिसणारी सूज आता पुर्णपणे कमी झाली असून त्या तब्बल ८ ते १० वर्षांनी तरुण झालेल्या दिसत आहेत.


 

शिवाय चेहऱ्यावरही पुर्वीपेक्षा खूपच जास्त ग्लो आलेला आहे. हल्ली सौंदर्य खुलविण्यासाठी कित्येक वेगवेगळे उपचार घेतले जातात. त्यापैकीच एखादा उपाय त्यांनी केला असावा अशी चर्चा रंगली आहे.

रितेश देशमुखने सांगितली त्याच्या घरातली तू तू- मै मै, सासू- सुनेच्या नात्यातले भन्नाट किस्से ऐकवत म्हणाला... 

पण त्यांनी काहीही केलं असलं तरी त्या अतिशय सुंदर दिसत आहेत, यावर जवळपास सगळ्यांचच एकमत झालेलं असून काही जणांना त्या भारतीय अभिनेत्री दिया मिर्झा हिच्यासारख्याच सुंदर दिसत आहेत.  

 

Web Title : पाकिस्तानी मंत्री का रूप बदला: पहले और बाद की तस्वीरें वायरल

Web Summary : पाकिस्तानी मंत्री मरियम औरंगजेब का बदला हुआ रूप चर्चा में है। शादी में शामिल होने के बाद उनका चेहरा अधिक तीक्ष्ण, कम फूला हुआ और युवा दिख रहा है। कुछ लोगों को वह अभिनेत्री दीया मिर्जा जैसी लगती हैं। सौंदर्य उपचारों के बारे में अटकलें लगाई जा रही हैं।

Web Title : Pakistani Minister's Transformation: Before-and-After Photos Spark Global Buzz

Web Summary : Pakistani minister Marriyum Aurangzeb's changed appearance sparked online discussion. Her face looks sharper, less puffy, and more youthful after attending a wedding. Some think she resembles actress Dia Mirza. Speculation surrounds potential beauty treatments.