आपल्या घरात चहा - कॉफी पिण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कप असतात. हे कप काच किंवा चिनीमातीच्या मटेरियल पासून तयार केलेले असतात. काचेचे कप हे दिसायला सुंदर पण (One Simple Trick to Keep Glass Cups from Cracking or Breaking) ते तितकेच नाजूकही असतात. काचेचे कप नेहमीच्या वापरात (Make Your Glass Cups Last for Years with This Simple Tip) आपण हमखास वापरतोच. हे कप वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते. काचेचे कप वापरताना सतत आपल्याला भीती असते ती म्हणजे, हे कप फुटतील किंवा त्यांना तडे जातील. महागामोलाचे कप आणून जर का ते हातातून पडून फुटले तर अक्षरशः जिव्हारी लागत(Prevent Cracks and Breaks in Glass Cups with One Smart Step).
अनेकदा गरम पदार्थ ओतल्यावर कपाला तडे जातात, किंवा अचानक ते फुटतात. कधी स्वच्छ करताना हलकासा धक्का लागल्यानंतरही ते तुटण्याचा धोका असतोच. परंतु विकत आणलेले नवीन काचेचे कप लगेच फुटू नये किंवा त्यांना तडे जाऊ नये यासाठी, हे नवीन कप वापरण्यापूर्वी फक्त एक छोटंसं काम केल्याने ही समस्या टाळता येते. एक साधासुधा घरगुती उपाय (How to Stop Glass Cups from Breaking – Easy Home Solution) केल्याने काचेचे कप वर्षानुवर्षे चांगले टिकू शकतात आणि त्यांची चमक देखील नव्यासारखीच कायम राहील. नवीन कप विकत आणल्यावर सर्वात आधी ते वापरण्यापूर्वी काय करावं ते पाहा...
काचेचे कप फुटतात, तडे जातात ? करा १ साधसुध काम...
नवीन काचेचे कप आणल्यावर ते थेट वापरण्याऐवजी, एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करून त्यात हे कप १० ते १५ मिनिटे बुडवून ठेवा (पाणी उकळत नसेल तरीही गरम असावं). नंतर ते थंड होऊ द्या आणि व्यवस्थित कोरडे करून वापरा.
कढई - तव्याच्या कडेला साचला काळाकुट्ट थर? १ भन्नाट ट्रिक - न घासताच होईल मिनिटांत चकाचक...
पेस्ट कंट्रोल करुनही ढेकूण जात नाहीत? खिशाला परवडेल असा जालीम उपाय - ढेकूण परत होणारच नाही!
यामुळे काचेला "टेम्परिंग" इफेक्ट मिळतो, म्हणजेच काच अधिक मजबूत आणि गरम तापमानाला अधिक सहनशील बनते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गरम पदार्थ ओतला तरी लगेच तडे जात नाहीत किंवा कप फुटत नाहीत. ही प्रक्रिया कपांवरील आंतरिक ताण कमी करते, जे बहुतेकदा काचेचे कप फुटण्यामागील महत्वाचं कारण असते.
लक्षात ठेवा...
१. काचेच्या कपात कधीही अचानक गरम पदार्थ ओतू नका.
२. कप फुटणार नाहीत अशा जागी व्यवस्थित स्टोअर करून ठेवा.
३. कप स्वच्छ करताना थंड पाण्याचा वापर करा.