आपल्या स्वयंपाकघरात तेलाचा सगळ्यात जास्त वापर केला जातो. फोडणी देण्यापासून ते तळण्यापर्यंत अनेक गोष्टी आपण स्वयंपाकघरात करतो.(Simple kitchen tips to clean oil bottles) स्वयंपाकघरातील तेलाची बाटली अशी एक वस्तू आहे जी लवकर खराब होते आणि तिच्यावर डाग पडतात आणि काही दिवसांतच बाटली तेलकट होते. (How to clean greasy oil bottles at home)
अनेकदा तेलाची बाटली आपल्याला बाहेरुन स्वच्छ करता येते पण आतून स्वच्छ करताना त्रास होतो.(Remove grease from bottles) वरचा भाग हा निमुळता असल्याने आपल्याला व्यवस्थित साफ करता येत नाही. अशा बाटल्या आपल्या घरात असतील तर त्या साफ कशा करावा हा प्रश्न सगळ्यांपुढे असतो.(Tips to keep oil bottles clean and non-sticky) काही सोपे घरगुती उपाय केले तर बाटली लगेच साफ होईल आणि चिकट ही राहणार नाही.
मातीचा तवा वापरण्यासाठी ३ महत्वाच्या टिप्स, भाकरी-चपातीसाठी होईल एकदम परफेक्ट, फुटणारही नाही
1. कोमट पाणी वापरा
सगळ्यात आधी बाटली रिकामी करुन त्यात कोमट पाणी घाला. यामुळे बाटलीच्या तळाशी जमा झालेले अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत होईल.
2. टिश्यू पेपरचा वापर
बाटलीचे झाकण किंवा त्याच्या बाहेरच्या आवरणावर तेल असेल तर टिश्यू किंवा किचन टॉवेलने पुसून घ्या. त्यावर आलेले अतिरिक्त तेल पुसा. ज्यामुळे चिकटपणा कमी होईल.
3. डिशवॉशिंग लिक्विड
कोमट पाण्यात थोडासा डिशवॉश मिसळा आणि ते बाटलीत भरा. काही वेळ तसेच राहू द्या. नंतर बाटली चांगली हलवा आणि धुवा. बाटली स्वच्छ करण्याचा ब्रश असेल तर त्याचा वापर करता येईल.
4. लिंबू पाणी आणि व्हिनेगर
तेलाचा वास आणि चिकटपणा काढून टाकण्यासाठी बाटली पुन्हा एका सायट्रिक आम्लने स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. लिंबाचा रस किंवा पांढरा व्हिनेगर पाण्यात मिसळून चांगले धुवा.
5. डिश वॉश आणि कोमट पाणी
तेलाचे चिकट-मेणचट डाग काढण्यासाठी बाटलीमध्ये डिशवॉश आणि कोमट पाणी घालून झाकण लावा. बाटली हलवून घ्या. ज्यामुळे बाटलीच्या आत असणारा चिकटपणा निघेल. तसेच बाहेरच्या बाजून स्क्रबने घासून घ्या. बाटली स्वच्छ होण्यास मदत होईल.