Join us

आता पुरुषांनी स्वीकारायला हवं की..!-मधुराणी गोखले म्हणते, महिला बदलल्या पण पुरुष मात्र..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2025 18:15 IST

Now men should accept that..! - listen what Madhurani Gokhale says : पुरुषांना आता समजून घ्यायला हवं. महिला सक्षम आहेत.

महिलांच्या तोंडी सतत असणारा एक शब्द म्हणजे फेमिनिझम. बदलत्या जगात आता महिलांची भूमिका चूल आणि मुल एवढीच उरलेली नाही. (Now men should accept that..! - listen what Madhurani Gokhale says   )एक महिला आता एखाद्या कंपनीची सीइओ होऊ शकते. एखादी खेळाडू होऊ शकते. महिलांच्या भूमिका तर बदलत चालल्या आहेत. पण समाजाच्या विचारांचं काय? त्यांमध्ये काही परिवर्तन आहे का?(Now men should accept that..! - listen what Madhurani Gokhale says   ) असे प्रश्न फेमिलिस्ट सतत विचारत असतात. भारतातही फेमिनिझम झपाट्याने वाढत चालला आहे. मानसिकता बदलायला वेळ लागतो. पण ती बदलणं महत्त्वाचं. असा सकारात्मक विचारही प्रियांका सारख्या गाजलेल्या अभिनेत्री सांगत असतात. 

मराठी अभिनेत्रीही आता पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांची मते मांडताना दिसतात. मध्यंतरी टेलिव्हीजनवर गाजलेल्या 'आई कुठे काय करते' मालिकेमधील 'आई'ने म्हणजेच 'मधुराणी गोखले-प्रभुलकर' हीने हल्लीच 'इसापनीती इंटरटेंमेंट' या चॅनलवर संवाद साधताना, फार मोलाचा मुद्दा मांडला आहे. एक आई, एक महिला काय काय करते, ते पुरुषांना समजून घ्यायची गरज आहे. असं मत तिने मांडले आहे. 

मधुराणी म्हणाली, "महिलेला आता मुठीत ठेवणे शक्य नाही. पुढील पिढ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. ती तुमच्या खांद्याला खांदा लावून चालते आहे. हे आत्मसात करा. हेल्दी समाज निर्माण करायचा असेल तर, पुरुषांनी महिलांना स्वत:पेक्षा कमी लेखणं बंद करा. आता वेळ आली आहे की , पुरुषांनी हे समजून घ्यायला हवं. पुढच्या महिला स्ट्रॉंग वूमन म्हणूनच असणार आहेत. त्यामुळे पुरुषांना ते मान्य करवा लागेल. नाहीतर  समाज पोषक मानसिकतेचा होणार नाही. मला खात्री आहे महिलेला समानस्थानी बघायला पुरूष हळूहळू शिकतील. कारण दोघांना एकत्र चालायचं आहे. पुरुषाला स्त्रीची आणि स्त्रीला पुरुषाची गरज असते."

आता मराठी इंडस्ट्रीत काम करणाऱ्या महिलाही आपली मते रोखठोक मांडायला लागल्या आहेत. तुम्हीही स्वत:चं मत मांडा. ते फार महत्त्वाचं आहे. मधुराणी गोखले-प्रभुलकरने सांगितल्याप्रमाणे, पुरुषांना आता हे मान्य करावं लागेल की, महिला सशक्त आहेत. पण त्यांना ते पटवून देण्याची जबाबदारी महिलेचीच आहे.  

 

टॅग्स :महिलासामाजिकसेलिब्रिटीमराठी