Join us

फळांच्या सालांचे ऑरगॅनिक क्लिनर लिक्विड आता करा घरीच, विकतचे रासायनिक लिक्विड नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2025 19:13 IST

Now make organic fruit peel cleaner liquid at home, no need for store-bought chemical liquids : फळांची सालं वापरुन घरीच तयार करा मस्त लिक्विड क्लिनर. पाहा सोपी पद्धत.

घराची साफसफाई करणे फार गरजेचे असते. फक्त घर सुंदर दिसण्यासाठीच नाही तर स्वच्छ राहवे घरात जिवाणू विषाणू उरु नयेत यासाठी घर छान साफ करणे गरजेचे असते. (Now make organic fruit peel cleaner liquid at home, no need for store-bought chemical liquids)त्यामुळे आपण रोजच्या रोज केर काढल्यावर लादी पुसतो. लादी पुसल्यावरच घर खरे साफ होते फक्त कचरा काढून उपयोग होत नाही. कचरा काढल्यावर माती धूळ तर जाते मात्र डाग, जंतू राहतात. त्यासाठी आपण लादी पुसतो. तसेच इतरही गोष्टी जसे की कपाट, इतर फर्निचर, टेबल, खुर्ची सगळ्याच वस्तू छान स्वच्छ करायची गरज असते. त्यासाठी आपण विकतचे क्लिनर वापरतो. मात्र असे क्लिनर वापरणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यात रसायने असतात. घरात लहान मुली असतील तर त्यांना क्लिनर्समुळे त्रास होऊ शकतो. 

घरी फळांच्या सालांचा वापर करुन बायो एन्झाइम क्लिनर तयार करता येतात. त्यासाठी अगदी कमी सामग्री लागते. (Now make organic fruit peel cleaner liquid at home, no need for store-bought chemical liquids)फक्त तीन गोष्टींचा वापर करुन हे क्लिनर करता येते. मात्र करायला वेळ जास्त लागतो. एकदा तयार झाले की टिकतेही बरेच दिवस.

१. हे क्लिनर तयार करण्यासाठी पॅनमध्ये पाणी गरम करत ठेवा. त्यात थोडा गूळ घाला. पाणी जरा कोमट झाल्यावर त्यात किसलेला गूळ घालायचा. गूळ व्यवस्थित विरघळू द्यायचा. गार झाल्यावर पुन्हा ढवळायचा.     

२. एका स्वच्छ प्लासिकच्या बाटलीत संत्री, मोसंब, केळी अशा फळांची साले घ्यायची. त्यावर तयार केलेले गूळाचे पाणी ओतायचे. पाणी भरपूर घ्यायचे. 

३. झाकण लावायचे आणि ती बाटली एका अंधार्‍या जागेत ठेवायची. महिनाभरासाठी रोज बाटलीचे झाकण उघडायचे आणि गॅस जाऊ द्यायचा. त्यानंतर ६० दिवसांसाठी त्या बाटलीला अजिबात हात लावायचा नाही. तीन महिन्यांसाठी बाटली तशीच ठेवायची. ती महिन्यांनंतर बाटलीतील लिक्विड गाळून घ्यायचे. गाळून झाल्यावर एका स्वच्छ बाटलीत लिक्विड काढून घ्यायचे. वापरताना थोडे लिक्विड आणि थोडे पाणी असे प्रमाण घ्यायचे, लादी ओटा सगळ्यासाठी हे लिक्विड वापरता येते.       

टॅग्स :होम रेमेडीकिचन टिप्सघरगुती उपाय