Join us
Daily Top 2Weekly Top 5

कितीही मैत्री असली तरी १० गोष्टी ऑफिस कलिगला सांगणे धोक्याचे..! अमेझॉनमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा सल्ला व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2026 12:53 IST

No matter how much friendship you have, it's dangerous to tell 10 things to your office colleague..! Advice from a young woman working at Amazon goes viral : ऑफीसमध्ये अजिबात बोलू नका याविषयांवर.

एखाद्या ठिकाणी लोकांशी बोलताना किंवा आपल्याबद्दल माहिती शेअर करताना मर्यादा राखणं फार गरजेचं असतं. समोरचा आपला कितीही खास असला तरी कोणाशी कोणत्या विषयावर बोलावं हे महत्त्वाचंच आहे. असं आपल्याला घरचे वडिलधारे तर कायम सांगतातच. (No matter how much friendship you have, it's dangerous to tell 10 things to your office colleague..! Advice from a young woman working at Amazon goes viral)सध्या इंस्टाग्रामवर एक असाच काहीसा संदेश देणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात अॅमेझॉनमध्ये काम करणारी एक मुलगी तिच्या अनुभवातून अशा १० गोष्टींची यादी देत आहे ज्या ऑफीसमध्ये कधीच कोणाशीच बोलू नयेत. तिच्या सांगण्यानुसार या १० गोष्टींबद्दल बोलण्याचा परिणाम आपल्या करियरवर होतोच. अशा १० गोष्टी ज्या ऑफीस कलिगशी बोलू नयेत, पुढीलप्रमाणे - 

१.  तुम्ही किती कमवता हे सहकर्मचाऱ्याला कधीच सांगू नका. त्यामुळे फक्त स्पर्धा वाढते बाकी काही होत नाही. दोघांमध्ये तणाव निर्माण होतो. 

२. त्या मुलीच्या अनुभवानुसार ऑफीसमध्ये बसून जर गॉसिप करत असाल तर त्याचा परिणाम कामावर होतोच. अपयश येतं आणि कामातही अडथळे येतात. 

३. सहकर्मचाऱ्यांबद्दल वाईट अजिबात बोलू नका, अशा टिपण्ण्या वाऱ्यासारख्या पसरतात. कधीतरी ही गोष्ट आपल्यावरच उलटते आणि मग त्याचा परिणाम आपल्या प्रतिष्ठेवर होतो. 

४. आपल्या खाजगी आयुष्यातील गोष्टी अजिबात बोलू नका. घरातील भांडणं. रिलेशनशीप्स. इतरही काही खाजगी गोष्टी असतात त्या ऑफीसमध्ये सांगू नयेत. लोकं त्याचा वेगळ्याआर्थी  वापर करु शकतात. 

५. प्रकृती , आजारपण याबद्दलही जर गरजेचे असेल तरच सांगा. उगाच आजाराबद्दल किंवा मेडिकल हिस्ट्रीबद्दल कोणालाही सांगू नका. त्याचा परिणाम थेट कामावर होतो. 

६. असे काही विषय आहेत जे फक्त वादात रूपांतरित होतात, त्यातून काहीच निष्पन्न होत नाही ते टाळा. जसे की पॉलिटीक्स आणि धर्म-जातपात याबद्दल बोलणे. सगळ्यांची मतं वेगळी असतात त्यामुळे वाद होतात. दरी वाढते.

७. बॉसही वाद झाला किंवा कामाचं जास्त प्रेशर असेल तरी बॉसबद्दल कधीच सहकर्मचाऱ्यांशी बोलू नये. फार नाजूक विषय आहे. राग, अपेक्षा , निराशा सगळं मनात ठेवा असं नाही पण ऑफीसमध्ये नका बोलू.  

८. जर नवी नोकरी शोधत असाल तर त्याबद्दल अगदी शेवटा पेपर मिळेपर्यंत कोणाला सांगू नका. त्याचा कामावर चांगलाच परिणाम होतो. 

९. जर वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्तच सांगत असाल तर तसं करु नका. त्यामुळे मर्यादांना काहीच अर्थ उरत नाही. तसेच त्याचा करियरवर परिणाम होण्याची शक्यता वाढते. 

१०. ऑफीसबद्दल काही गुप्त माहिती तुम्हाला कळली असेल, जी सगळ्यांना माहिती नाही तर ती शेअर करु नका. त्याचा परिणाम फार वाईट होऊ शकतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Office secrets: Amazon worker reveals 10 things to never share.

Web Summary : An Amazon employee's viral video advises against sharing salary, gossiping, or personal life details with colleagues. It warns about discussing health issues, politics, job searches, and confidential office information, as these can negatively impact one's career and reputation.
टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाअ‍ॅमेझॉनमहिलापगार