Join us

"आलियाचं आणि माझं नातं असं असावं की...'' सून घरी येणार म्हणून नीतू कपूर सांगतात......

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2022 17:42 IST

Social Viral: लग्न करून आलिया सून म्हणून घरी कधी येणार... हे अजूनही गुलदस्त्यात असलं तरी नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी मात्र आतापासूनच होणाऱ्या सुनेकडून त्यांना असणाऱ्या अपेक्षा सांगून टाकल्या आहेत...

ठळक मुद्देनीतू कपूर यांनी होणाऱ्या सुनेकडून म्हणजेच आलियाकडून त्यांना असणाऱ्या अपेक्षा मनमोकळेपणाने जाहीर केल्या आहेत.

सासू- सुनेची जोडी कोणतीही असो, अगदी सामान्य कुटुंबातल्या सासू- सुनेपासून ते सेलिब्रिटी सासू- सुनांपर्यंत.. प्रत्येक जोडी खासच असते. आणि दोघींच्या एकमेकींकडून असणाऱ्या अपेक्षाही थोड्या- फार फरकाने सारख्याच असतात. नव्या सुनेला आपल्या सासरच्या मंडळींकडून विशेषत: आपल्या सासूकडून जशा अपेक्षा असतात, तशाच अपेक्षा सासूलाही नव्या सुनेकडून असतातच.. घरी नांदायला येणाऱ्या सुनेकडून अशाच अपेक्षा आता एका भावी सेलिब्रिटी सासुबाईंनी व्यक्त केल्या आहेत. (Ranbir Kapoor and Alia Bhat)

 

रणबीर आणि आलियाच्या लग्नाचा (wedding) विषय चांगलाच चर्चिला जात आहे.. एकीकडे आलियाच्या काकांनी लग्नाची तारीख १७ एप्रिल असल्याचं सांगितलंय तर दुसरीकडे नीतू कपूर यांना याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी चक्क 'देवालाच माहिती' असं उत्तर देऊन सगळ्यांनाच चकीत केलं आहे.. यातलं नेमकं काय खरं आणि काय खोटं हे माहिती नसलं, तरी नीतू कपूर यांनी मात्र होणाऱ्या सुनेकडून म्हणजेच आलियाकडून त्यांना असणाऱ्या अपेक्षा मनमोकळेपणाने जाहीर केल्या आहेत.

 

याविषयी ई- टाईम्सशी बोलताना नीतू कपूर म्हणाल्या की सासू- सून म्हणून माझी आणि आलियाची एकमेकींशी अगदी स्पेशल बॉण्डिंग व्हावी, असं मला वाटतं.. यावेळी नीतू यांना त्यांच्या सासूबाई कृष्णा कपूर (Krishna Kapoor) यांचीही आठवण आली. त्या म्हणाल्या की माझं आणि माझ्या सासूबाईंचं नातंही खूपच खास आणि छान होतं.. आम्ही तासनतास एकमेकींशी गप्पा मारायचो. आमची दोघींची खूप छान अटॅचमेंट होती. जवळपास सगळ्याच विषयांवर आम्ही एकमेकींशी मोकळेपणाने बोलत बसायचो. आमच्या गप्पा एवढ्या रंगायच्या की मी कधीकधी नवऱ्याच्या तक्रारीही त्यांना सांगून टाकायचे. आलियाचे आणि माझे नातेही असेच मोकळे, ओपन असावे, सासू- सून म्हणून तिची आणि माझीही अशीच छान मैत्री व्हावी... अशी अपेक्षा नीतू कपूर यांनी आलियाकडून व्यक्त केली आहे.. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलआलिया भटरणबीर कपूररणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठनितू सिंग