Join us
Daily Top 2Weekly Top 5

नीतू कपूरला मुळीच आवडली नव्हती आलियाने तिच्या लग्नात केलेली 'ही' गोष्ट, दोघींची होती टाेकाची मतं.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2025 17:01 IST

Bollywood Viral: आलिया भटने (Alia Bhatt) तिच्या लग्नात जी एक गोष्ट केली ती तिच्या सासुबाईंना म्हणजेच नीतू कपूर (Neetu Kapoor) यांना मुळीच आवडली नव्हती..

ठळक मुद्देसगळं असं छान छान झालेलं असलं तरी आलियाच्या सासुबाईंनी म्हणजेच नितू कपूर यांनी एका गोष्टीविषयी मात्र नाराजी व्यक्ती केली आहे..

आलिया भट आणि रणबीर कपूर यांचं लग्न म्हणजे बाॅलीवूडमधल्या सगळ्यात जास्त चर्चिल्या गेलेल्या लग्नांपैकी एक.. ते दोघेही तगडे सुपरस्टार. शिवाय दोघेही अशा कुटूंबातले आहेत ज्या कुटूंबांचा बॉलीवूडमध्ये दबदबा आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाची जबरदस्त चर्चा झाली. त्यांच्या लग्नातल्या कित्येक गोष्टी खूप गाजल्या. त्यापैकी एक म्हणजे कोणताही थाटमाट न करता त्यांनी अगदी साधेपणाने लग्न केलं. शिवाय आलियाने एक नवरी म्हणून कसा मेकअप करावा, कसे दागिने घालावे, कसे कपडे घालावे या सगळ्यांबद्दलचा पुर्णपणे नवा ट्रेण्ड तिच्या लग्नापासून आणला.. आता हे सगळं असं छान छान झालेलं असलं तरी आलियाच्या सासुबाईंनी म्हणजेच नितू कपूर यांनी एका गोष्टीविषयी मात्र नाराजी व्यक्ती केली आहे..

 

आलियाची आणि तिच्या सासुबाईंची रणबीर- आलियाच्या लग्नाविषयीची काय मतं होती, याविषयी त्यांच्या दोन वेगवेगळ्या मुलाखती झाल्या. या मुलाखतींचा छोटासा भाग bollywoodmerijaann या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

केस गळणं थांबून वाढतील दुपटीने! कांद्याचा रस घेऊन 'हा' शाम्पू तयार करा, केस होतील दाट

यामध्ये आलिया म्हणते की एका तिसऱ्याच वेगळ्याच ठिकाणी लग्नाचं ठिकाण ठरवा. तिथे जाऊन सगळी तयारी करा. शिवाय आपल्यासोबत एवढ्या सगळ्या लोकांना म्हणजेच वऱ्हाडी मंडळींना घेऊन जा आणि त्यांची व्यवस्था करा हे सगळं माझ्यासाठी खूप स्ट्रेसफूल आहे. अशा पद्धतीने सेलिब्रेशन करणाऱ्यांपैकी मी नाही. त्यामुळे आम्ही घरच्याघरी अगदी साधेपणाने लग्न केलं..

 

आलियाच्या या मताच्या अगदी विरुद्ध मत नितू कपूर यांचं होतं. त्या म्हणतात की आलिया आणि रणबीर यांचं लग्न कसं व्हावं, याचं आम्ही खूप प्लॅनिंग करत होतो. त्यांचं लग्न साऊथ आफ्रिका किंवा अन्य कुठे करायचं हे आम्ही ठरवत होतो, वेगवेगळे फोटो पाहून डेस्टिनेशन वेडिंगची तयारी करत होतो,

सिझेरियनवेळी मणक्यात इंजेक्शन दिलं म्हणूनच महिलांची पाठ दुखते का? डॉक्टर सांगतात बायकांचं कुठे चुकतं... 

अगदी २ वर्षे आम्ही असं सगळं प्लानिंग केलं पण या दोघांनी मात्र अगदी घरातच टेरेसमध्ये लग्न केलं. यामुळे साहजिकच नितू कपूर आणि त्यांच्यासोबतच रणबीर- आलियाच्या डेस्टिनेशन वेडिंगचं प्लॅनिंग करणाऱ्या कपूर मंडळींचा हिरमोड झाला असणार.. 

Link For Video

https://www.threads.com/@bollywoodmerijaann/post/DSfez4aEl4L?xmt=AQF0W-zdBZPkujhv9taScyXMSOv0Lz5K36nCsIi9_r0K0g

 

English
हिंदी सारांश
Web Title : Neetu Kapoor disliked Alia's wedding choice; differing opinions surfaced.

Web Summary : Alia Bhatt and Ranbir Kapoor's simple wedding contrasted with Neetu Kapoor's destination wedding dreams. Alia preferred an intimate ceremony, avoiding stressful large celebrations. Neetu had planned a grand affair, leading to disappointment.
टॅग्स :सोशल व्हायरलआलिया भटनितू सिंगरणबीर कपूररणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठ