नात आणि आजीच्या प्रेमाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. एखाद्या स्त्रीला जितका आनंद आई झाल्यावर होत नाही तितका आजी झाल्यावर होतो. अभिनेत्री नीना गुप्ता अलिकडेच आजी झाल्या आहेत. त्यांची मुलगी मसाबा गुप्ता हिनं मागच्या वर्षी ११ ऑक्टोबरला एका गोंडस मुलीला जन्म दिला.जिचे नाव मतारा गुप्ता असं ठेवले आहे. मसाबाची लाडकी लेक मतारा एक वर्षाची झाली असून ती आता हळूहळू बोलायला लागली आहे. नीना गुप्ता यांना नानी म्हणण्याऐवजी ती 'नीना' असं म्हणते.
मसाबा गुप्तानं अलिकडेच कुटूंब आणि जवळपासच्या लोकांसोबत साध्या पद्धतीनं ३६ वा बर्थडे साजरा केला. ज्याची झलक सोशल मीडियावर शेअर केली. बेबी मतारा आणि आई नीना गुप्ता यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पूर्ण लक्ष मतारा आणि तिच्या आजीनं वेधून घेतलं आहे. हा प्रसंग खूपच अनोखा आहे.
आजी झाल्यानंतर नीना गुप्ता या खूपच आनंदी असून त्यांनी नातीबाबतच्या आपल्या भावनिक प्रवासाबाबत सांगितले आहे. नीना जास्तीत जास्त काळ आपल्या लेकीसोबत राहतात जेणेकरून त्यांना आपल्या छोट्या नातीसोबत वेळ घालवता येईल. नीना गुप्ता यांच्या नातीसोबतचा एक व्हिडिओ मसाबानं शेअर केला आहे. या व्हिडिओध्ये मतारासुद्धा दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटिझन्सनी हा व्हिडिओ खूपच क्यूट असल्याचे सांगितले आहे.
व्हिडिओमध्ये नीना गुप्ता नातीसोबत खेळताना दिसून येत आहेत. त्या मताराला ओम चे उच्चारण आणि डिप ब्रिदिंग करायला शिकवत आहेत. मतारा या व्हिडिओत नीना, नीना बोलत आहे. नातीच्या तोंडून आपलं नाव ऐकून नीना खूश होत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना नीना यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, फक्त आनंद, हॅप्पी बर्थडे मसाबा. नात आणि आजीचं हे प्रेम पाहून सोशल मीडिया युजर्सनाही आनंद झाला आहे. खासकरून मताराच्या क्यूटनेसने त्यांचं मन जिंकलं आहे. कमेंट सेक्शनमध्ये प्रेमाचा वर्षाव केला आहे.
