Join us

थोडीसी दारू चाहिए.. असं म्हणत रडत मूल दंगा करतंय.. पाहा व्हायरल व्हिडिओ; सांगा चूक कुणाची..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2022 14:16 IST

Social Viral Video लहान लेकराने दारु मागावी इतपत माहिती त्याला कुणी आणि का दिली असेल?

लहान लेकरानं दारु द्या म्हणून हट्ट धरला असं पाहिलं, ऐकलं तर तुमच्या मनात काय येईल? लेकरांसमोर दारु न पिणं, त्यांना व्यसनापासून लांब राहायला शिकवणं हे पालकांचं काम. मात्र नव्या काळात लहान वयातच मुलांसमोर काही अशोभनिय गोष्टी येतात आणि मग त्याचं रुपांतर असं नको त्या हट्टात होतो. तसाच हा एक व्हायरल व्हिडिओ, लहान मूल आपल्या बाबांकडे दारु मलाही दे म्हणून हट्ट करतंय.. दुर्देव हे की अनेकांना हा व्हिडिओ ही फनी आणि मनोरंजक वाटतो आहे.  

थोडीसी दारु चाहिये म्हणत हे लहान मूल ढसढसा रडत आहे.

दूध पिण्याच्या वयात हे गोंडस लहान मूल दारूची मागणी वडिलांकडे करत आहे.  व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर 'जिंदगी गुलजार है' नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून, त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. दारु चाहिये म्हणून रडणाऱ्या मुलाला पाहून आणि त्याच्याशी बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज ऐकून अनेकांना हसू येतंय पण खरंच हा हसण्याचा विषय आहे का? चर्चा कितीही असली तरी मुलांसमोर समाज आणि पालक म्हणून नको त्या वयात आपण काय ठेवतो आहे याचाही विचार व्हायला हवा.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया