Join us

नवरात्र: देवीसाठी करा तिच्या आवडीचा खास गोविंद विडा! बघा गोविंद विडा करण्याची सोपी पद्धत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2024 18:08 IST

How To Make Govind Vida: नवरात्रीमध्ये (Navratri 2024) देवीसाठी गोविंद विडा करायचा असेल तर तो कशा पद्धतीने करावा याचा हा एक सुंदर व्हिडिओ पाहा... (simple trick for making govind vida)

ठळक मुद्दे सगळ्यात मोठं पान खालच्या बाजूला आणि सगळ्यात छोटं पान वरच्या बाजूला अशा पद्धतीने पाने एकमेकांवर रचा.

नवरात्रीमध्ये तांबूल, विड्याचे पान यांना खूप महत्त्व आहे. कारण देवीला या दोन्ही गोष्टी अतिशय प्रिय असतात (Navratri 2024), असं मानलं जातं. विडा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. त्यामुळे या निमित्ताने तो खाण्यात आला तर आरोग्यासाठी ते चांगलेच आहे. नवरात्रीमध्ये तसेच महालक्ष्मीसाठी अनेक जण गोविंद विडा आवर्जून करतात (how to make govind vida?). तो कसा करायचा याची ही सोपी पद्धत एकदा पाहा आणि या नवरात्रीमध्ये देवीसाठी झटपट गोविंद विडा करा...(simple trick for making govind vida)

 

गोविंद विडा कसा करावा?

गोविंद विडा करण्यासाठी आपल्याला ५ पाने लागणार आहेत.

गोविंद विड्यासाठी पाने निवडताना ती एकसारख्या आकाराची निवडू नका. एकापेक्षा दुसऱ्याचा आकार मोठा असेल अशा पद्धतीने पाच पाने घ्या. 

मुलांचं मन मोडणारी 'ही' गोष्ट तुम्ही करत नाही ना? पालक म्हणून एकदा तपासून पाहा

पानांची देठं काढून टाका आणि सगळ्यात मोठं पान खालच्या बाजूला आणि सगळ्यात छोटं पान वरच्या बाजूला अशा पद्धतीने पाने एकमेकांवर रचा.

त्यानंतर जे पान सगळ्यात वर आहे, त्यावर नेहमीप्रमाणे कात, चुना, सुपारी, बडीशेप, लवंग, वेलची, गुलकंद, धना डाळ आणि तुमच्या आवडीनुसार इतर काही पानाचे साहित्य टाका.

 

त्यानंतर ते पान अशा पद्धतीने दुमडा की त्याचे एक बंद निमुळते टोक खालच्या बाजूने होईल आणि वर पसरट आकार होईल. त्या पानाचा आकार त्रिकोणी दिसेल, अशा पद्धतीने ते दोन्ही बाजूंनी दुमडावे.

९० टक्के महिलांना माहितीच नाही फ्रिजचा 'असा'ही वापर होऊ शकतो! फ्रिजचे ५ भन्नाट उपयोग

आता पानाचा जो पसरट भाग आहे, तो खालच्या बाजूने आणि टोकाचा भाग वरच्या बाजूने घ्या. यानंतर ते पान तसेच त्याच्या खालच्या पानावर ठेवा. खालचे पान आडवे असावे. त्यानंतर ते पान दोन्हीकडून दुमडून खालच्या बाजुने ओढावे. 

अशाच पद्धतीने एकानंतर एक उरलेली पाने दुमडा. त्यानंतर सगळ्यात शेवटचं म्हणजेच पाचवं पान दुमडून झालं की त्याला खालच्या बाजुने लवंग लावा. गोविंद विडा झाला तयार. 

 

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२४नवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४अन्नपाककृती