Join us

ऐ हॅलो! नवरात्रीत डांडियात हमखास थिरकायला लावणारी टॉप 5 हिंदी गरबा गाणी, नुसती धमाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 14:11 IST

Best Garba Songs : लोक गरबा करण्यासाठी यूट्यूबवर वेगवेगळी गाणी शोधत असतात. अशात आम्ही सुद्धा आपल्यासाठी गरबा आणखी रंगतदार करण्यासाठी काही बॉलिवूड गाणी सुचवत आहोत. 

Best Garba Songs : दुर्गा मातेचं आगमन झालेलं आहे. या दिवसांमध्ये केवळ देवीची केवळ मनोभावे पूजाच करतात असं नाही तर खूप मजामस्तीही केली जाते. 9 दिवस गरबा करण्यासाठी लोकांची झुंबड उडते. सगळे लोक एकत्र येऊन गरबा करून आनंद व्यक्त करतात. गोल राऊंडमध्ये सगळेच गाण्यांच्या (Navratri Garba Songs) तालावर एका लयीमध्ये थिरकत आपलं मन मोकळं करतात. यावेळी जास्तीत जास्त लोक रंगीबेरंगी पारंपारिक कपडे परिधान करतात. पण या गरबा नाइटची खरी मजा असते ती डीजेवर वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांची (Garba Songs 2025). लोक गरबा करण्यासाठी यूट्यूबवर वेगवेगळी गाणी शोधत असतात. अशात आम्ही सुद्धा आपल्यासाठी गरबा आणखी रंगतदार करण्यासाठी काही बॉलिवूड गाणी सुचवत आहोत. 

उडी उडी जाए

शाहरूख खानच्या 'रईस' सिनेमातील हे गाणं गरब्यासाठी एकदम परफेक्ट आहे. सुखविंदर सिंह, भूमि त्रिवेदी आणि कर्जन सरगथिया यांच्या आवाजातील हे गाणं आपल्याला थिरकवल्याशिवाय राहणार नाही.

ढोलीदा

आलिया भट्टच्य 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमातील 'ढोलीदा' हे गाणं गरब्यासाठी खूप बेस्ट ठरेल. या गाण्याच्या प्रत्येक लाइनमध्ये गरब्याचा जोश आणि आनंद अनुभवता येऊ शकतो.

कमरिया

'मित्रों' सिनेमातील हे गाणं गरबा नाइट्समध्ये खूप धमाल उडवतं. कारण या गाण्यात जोश आणि सोबतच गुजराती परंपराही दिसून येते.

राधा कैसे ना जले

'लगान' सिनेमातील हे 'राधा कैसे ना जले' गाणंही गरब्यासाठी परफेक्ट आहे. गरब्यात हे गाणं वाजवालं जाणार नाही असं होऊ शकत नाही. कारण यात एक वेगळाच जोश आहे.

नगाडा संग ढोल

'गोलियों की रासलीला राम-लीला' सिनेमातील हे गाणं एक पारंपारिक गरबा गीत आहे. ज्यात रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोननं जबरदस्त डान्स केला आहे. या गाण्यात जल्लोष आणि जोशही भरपूर आहे.

ही पाच गाणी गरबा करताना आपल्याला नक्कीच एक वेगळीच मजा देतील आणि आपला उत्साह अधिक वाढवतील. 

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२५नवरात्री गरबा २०२४सोशल व्हायरल