Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > पिठात पोरकिडे होतात-जाळं लागतं? ५ रूपयांची ही पानं डब्यात ठेवा- पीठ राहील चांगले

पिठात पोरकिडे होतात-जाळं लागतं? ५ रूपयांची ही पानं डब्यात ठेवा- पीठ राहील चांगले

Natural Way To Store Wheat Flour : पिठात किडे होऊ नयेत यासाठी तमालपत्र खूपच महत्वाचं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 09:10 IST2026-01-31T09:08:00+5:302026-01-31T09:10:02+5:30

Natural Way To Store Wheat Flour : पिठात किडे होऊ नयेत यासाठी तमालपत्र खूपच महत्वाचं आहे.

Natural Way To Store Wheat Flour For Years And Prevent Weevil And Worms By Using Bay Lef | पिठात पोरकिडे होतात-जाळं लागतं? ५ रूपयांची ही पानं डब्यात ठेवा- पीठ राहील चांगले

पिठात पोरकिडे होतात-जाळं लागतं? ५ रूपयांची ही पानं डब्यात ठेवा- पीठ राहील चांगले

स्वंयपाकघरात ठेवलेलं गव्हाचं पीठ खराब होतं अशी तक्रार बऱ्याच जणांची असते. अनेकदा उन्हात सुकवून किंवा चाळून  गव्हातील पोर किडे काढले जातात.  पण एक नैसर्गिक, साधा उपाय करून तुम्ही गव्हाच्या पिठातील पोरकिड्यांना दूर ठेवू शकता. गव्हात किंवा कोणत्याही धान्यात तुम्ही तमालपत्र घालू शकता. ज्यामुळे गव्हाच्या पिठात मॉईश्चर जमा होत नाही. अनेक उपाय केल्यानंतरही किड लागण्याचा धोका असतो.

पिठात किडे होऊ नयेत यासाठी तमालपत्र खूपच महत्वाचं आहे. यासाठी ३ ते ४ तमालपत्र पिठात ठेवा. तमालपत्राचा वास खूपच तीव्र असतो.  ज्यामुळे ते एक नैसर्गिक रिपेलंट म्हणून काम करते.  तमालपत्रात काही खास नैसर्गिक तेलं आणि तीव्र वास असतो जेव्हा तुम्ही डब्यात तमालपत्र घालता तेव्हा पूर्ण डब्यात याचा वास पसरतो. ज्यामुळे किड्यांची श्वसन प्रणाली प्रभावीत होते. ज्यामुळे किटक जवळ येत नाहीत. (Natural Way To Store Wheat Flour)

हा उपाय प्रभावी होण्यासाठी तुम्ही  ३ ते ४ तमालपत्र यात भरा. तेजपत्ता  ओला असेल तर त्यात मॉईश्चर येऊ शकते किंवा बुरशी लागण्याचा धोका असतो. म्हणून तमालपत्र ताजे असावे. या उपायानं वर्षभर पिठात किडे होणार नाहीत.

तमालपत्र हे केवळ स्वंयपाकाची चव वाढवत नाही तर अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी ही अत्यंत प्रभावी पद्धत आहे. ग्रामीण भागात आणि पारंपारीक साठवूण पद्धतींमध्ये अनेक वर्षांपासून याचा वापर केला जात आहे. रासायिक पावडर किंवा औषधांच्या तुलनेत तमालपत्र पूर्णपणे नैसर्गिक आहे. यामुळे धान्यांच्या चवीवर किंवा गुणवत्तेवर कोणताही विपरित परिणाम होत नाही आणि आरोग्यालाही कसलाही धोका नसतो.

तमालपत्र कसे वापरावे?

तांदूळ, गहू किंवा डाळी, पीठ साठवताना त्या डब्यामध्ये १० ते १५ कोरडी तमालपत्र व्यवस्थित परसवून ठेवावीत. जर धान्याचे प्रमाण जास्त असेल तर खालच्या, मधल्या आणि वरच्या थरात ही पानं ठेवावीत. पानांचा सुगंध कमी झाल्यावर ती बदलून नवीन पानं घालावीत.

Web Title : तेज पत्ता आटे को रखे कीड़ों से मुक्त; सरल उपाय।

Web Summary : तेज पत्ते से आटे को कीड़ों से बचाएं। इसकी तेज गंध प्राकृतिक रूप से कीटों को दूर रखती है। आटे के डिब्बे में 3-4 पत्ते रखें, गंध कम होने पर बदलें, और पूरे साल बिना रसायन के सुरक्षा सुनिश्चित करें। यह एक पारंपरिक, सुरक्षित तरीका है।

Web Title : Bay leaves keep flour insect-free naturally; simple storage tip.

Web Summary : Protect flour from insects with bay leaves. Their strong scent repels pests naturally. Place 3-4 leaves in flour containers, replacing when fragrance fades, ensuring year-long protection without chemicals. A traditional, safe method.