Join us  

सोशल मीडियात लोकप्रिय असलेल्या नागालॅण्डच्या मंत्र्यांनी दीपिका पदूकोणसाठी पाठवली खास भेट, साधेपणा इतका की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2023 3:40 PM

Nagaland minister’s special gift for Deepika Padukone has a cultural significance : मस्तानीचे दिवाने जगाच्या कानाकोपऱ्यात, पाहा नागालॅण्डच्या मंत्र्यांनी दीपिकासाठी कोणतं गिफ्ट पाठवलं...

बॉलीवूडची मस्तानी अर्थात दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सोशल मीडियात कायम चर्चेत राहते. तिचा चाहतावर्ग फार मोठा आहे. तिने केलेली पोस्ट असो, किंवा तिच्यासाठी केलेली कोणीतरी खास पोस्ट असो, तिच्यासंदर्भातील प्रत्येक बातमी ही कायम व्हायरल होते. सध्या नागालॅण्डच्या मंत्र्यांनी (Nagaland Minister) दीपिकासाठी केलेली पोस्ट सोशल मिडीयात (Social Viral) व्हायरल होत आहे.

या एका पोस्टमुळे दीपिकाच्या चाहत्यांमध्ये चर्चा तर होतंच आहे, शिवाय त्यांनी दीपिकासाठी पाठवलेली भेटवस्तू ही लक्षवेधी ठरत आहे. त्यांनी दीपिकासाठी खास कोणतं गिफ्ट पाठवलं? त्यांची पोस्ट व्हायरल होण्यामागचं कारण काय? पाहूयात(Nagaland minister’s special gift for Deepika Padukone has a cultural significance).

नागालॅण्डच्या मंत्र्यांची भेट नेमकी कोणासोबत झाली?

नागालॅण्डचे मंत्री तेमजिन इमना अलॉन्ग लोंगकुमेर हे कायम सोशल मीडियात सक्रीय असतात. ते नागालॅण्डचे उच्च शिक्षण मंत्री असून, ते आपले विचार आणि केलेले कार्य सोशल मीडियात पोस्ट करत असतात. सध्या नागालॅण्डमध्ये हॉर्नबिल उत्सव सुरु आहे. या उत्सवाची खास झलक मंत्र्यांनी सोशल मीडियात शेअर केलीय. पण अलीकडेच त्यांनी केलेली दीपिकासंदर्भातली पोस्ट, नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. कारण या उत्सवात त्यांची भेट दीपिकाच्या कुटुंबाबरोबर झाली. या भेटीदरम्यान, त्यांनी नागालॅण्डचा विशेष खाऊ सुपूर्द केला.

लीच सॉक्स काय असतात? काजोलचा सवाल आणि सोशल मीडियात लीच सॉक्सची जोरदार चर्चा

नागालॅण्डच्या मंत्र्यांनी दिपिकासाठी कोणतं गिफ्ट धाडलं?

नुकतीच नागालॅण्डच्या मंत्र्यांची भेट दीपिकाच्या कुटुंबीयांबरोबर झाली. यादरम्यान, त्यांनी दीपिकासाठी खास सेंद्रिय भोपळा भेट म्हणून तिच्या आई वडिलांकडे सुपूर्द केला. दीपिकाच्या कुटुंबियांना भेट देत असतानाचा फोटो त्यांनी सोशल मीडियात शेअर केलाय. फोटो शेअर करत त्यांनी भन्नाट कॅप्शन देखील दिला आहे.

म्हणजे बायकांच्या जगण्याला काही किंमतच नाही का? ॲनिमल सिनेमाच्या निमित्ताने सोशल मीडियातला चर्चेतला प्रश्न

कॅप्शनमध्ये मंत्री लिहितात, 'दीपिका पदुकोणसाठी एक ऑरगॅनिक भेट. तिच्या पालकांना एक ऑरगॅनिक भेटवस्तू सुपूर्द केली. कारण-कुठेतरी मस्तानीला नागालँडच्या अप्रतिम भाज्यांचे विशेष कौतुकही वाटते.' त्यांची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल तर होत आहेच, शिवाय नागालॅण्डच्या मंत्र्यांना तिने साकारलेली मस्तानीची भूमिका भावली असल्याचं दिसून येतंय.

टॅग्स :दीपिका पादुकोणसोशल व्हायरलसोशल मीडिया