Lokmat Sakhi >Social Viral > "माझे जगण्याचे चान्सेस फक्त ३० टक्के होते, पण....", सोनाली बेंद्रे सांगते कॅन्सर झाला तेव्हाच्या आठवणी

"माझे जगण्याचे चान्सेस फक्त ३० टक्के होते, पण....", सोनाली बेंद्रे सांगते कॅन्सर झाला तेव्हाच्या आठवणी

Sonali Bendre About Her Cancer Treatment: २०१८ साली सोनाली ब्रेंद्रे हिला कॅन्सर झाला असल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून तिची विचार करण्याची प्रक्रिया कशी बदलून गेल, याविषयी तिने सांगितलेले काही किस्से....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2024 05:07 PM2024-04-29T17:07:14+5:302024-04-29T17:08:11+5:30

Sonali Bendre About Her Cancer Treatment: २०१८ साली सोनाली ब्रेंद्रे हिला कॅन्सर झाला असल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून तिची विचार करण्याची प्रक्रिया कशी बदलून गेल, याविषयी तिने सांगितलेले काही किस्से....

"My chances of survival were only 30 percent, but....", Sonali Bendre recounts her memories of getting cancer.Sonali Bendre explains how cancer changed her life and her thought process | "माझे जगण्याचे चान्सेस फक्त ३० टक्के होते, पण....", सोनाली बेंद्रे सांगते कॅन्सर झाला तेव्हाच्या आठवणी

"माझे जगण्याचे चान्सेस फक्त ३० टक्के होते, पण....", सोनाली बेंद्रे सांगते कॅन्सर झाला तेव्हाच्या आठवणी

Highlightsती म्हणाली की हळूहळू माझ्या विचारात फरक पडत गेला आणि मग मी "Why me?" याऐवजी स्वत:ला "Why not me?" असा प्रश्न विचारू लागले.

सुंदर चेहरा आणि मोहक हास्य असणारी सोनाली बेंद्रे चाहत्यांना नेहमीच आपलीशी वाटते. तिला जेव्हा कॅन्सर झाला आहे हे समजले होते, तेव्हा तिच्यासकट तिचे चाहतेही हादरून गेले होते. सोनाली म्हणते कॅन्सरचे माझे रिपोर्ट जेव्हा पॉझिटीव्ह आले होते, तेव्हा मला सतत वाटायचं की हे सगळं खोटं आहे आणि मी एक वाईट स्वप्न पाहते आहे. त्याक्षणी मी नेहमी स्वत:ला हा प्रश्न विचारायचे की मलाच का हा आजार झाला.. पण हळूहळू जसं जसं उपचारादरम्यान मी एकेक पाऊल पुढे जात गेले तसे तसे माझे विचारही बदलत गेले. (Sonali bendre explains how cancer changed her life and her thought process)

 

सोनाली बेंद्रे हिने नुकतीच Humans of Bombay यांना एक मुलाखत दिली होती. त्यात तिने कॅन्सरचे निदान झाल्यापासून ते त्याच्या उपचारापर्यंतचे अनेक किस्से सांगितले. ती म्हणाली की हळूहळू माझ्या विचारात फरक पडत गेला आणि मग मी "Why me?" याऐवजी स्वत:ला "Why not me?" असा प्रश्न विचारू लागले.

पोटावर लटकणारी चरबी कमी करण्यासाठी ५ व्यायाम- जो आवडेल तो करा, वजन झरझर उतरेल

एवढंच नाही तर तेव्हा मी असा विचारही करत होते की हा आजार माझ्या मुलाला किंवा माझ्या बहिणीला होण्याऐवजी मलाच झाला हे किती बरं झालं. कारण मला माहितीये की त्यांच्यापेक्षा या वेदना सहन करण्याची माझी ताकद खूप जास्त होती. शिवाय या आजारातून बाहेर पडण्यासाठी उत्तमोत्तम उपचार घेण्याचीही माझी क्षमता होती. या सकारात्मक गोष्टी तेव्हा माझ्यासाठी खूप मोठ्या आधार होत्या.

 

सोनाली सांगते की ती जेव्हा उपचारासाठी परदेशात गेली होती तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी तिचे सगळे रिपोर्ट पाहिले. तिचा कॅन्सर तेव्हा चौथ्या स्टेजला गेलेला होता.

सोनम कपूर सांगते तिच्या दाट- लांब केसांचं सिक्रेट, १ पैसाही खर्च न करता केस होतील मजबूत....

त्यामुळे यातून बाहेर पडण्याचे आणि जगण्याचे फक्त ३० टक्के चान्सेस होते.. हे सगळं ऐकणं माझ्यासाठी खूप धक्कदायक होतं. पण सगळे उपचार, सकारात्मक विचार, उपचारादरम्यान धरून ठेवलेली हिंमत यामुळे मी त्यातून यशस्वीपणे बाहेर पडू शकले. सोनालीने मांडलेले हे विचार खरोखरच या परिस्थितीतून जाणाऱ्या अनेकांसाठी हिंमत देणारे आहेत. 

 

Web Title: "My chances of survival were only 30 percent, but....", Sonali Bendre recounts her memories of getting cancer.Sonali Bendre explains how cancer changed her life and her thought process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.