Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस विजेता मुनव्वर फारुकीने केलं दुसरं लग्न, कोण आहे नवी बेगम मेहजबीन कोटवाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 15:07 IST

Munawar Faruqui Mehzabeen Coatwala Love story : मुनव्वर फारुकीच्या दुसऱ्या लग्नाची व्हायरल चर्चा जोरात आहे.

बिग बॉस  १७ चा विजेता मुनव्वर फारुकी पुन्हा एकदा त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. मुनव्वर फारुकीचे काही दिवसांपूर्वी मेहजबीन कोटवालासोबत  लग्न झाले अशी चर्चा आहे.या दोघांचे फोटोही सोशल मीडियावर काही प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोत हे दोघे केक कापताना दिसून येत आहेत. (Munawar Faruqui Mehzabeen Coatwala Love story) रिपोर्टसनुसार दोघांचे लग्न आणि रिसेप्शन गुप्त पद्धतीने पार पडले. मात्र, या जोडप्याने अद्याप कोणतीही अधिकृत पोस्ट किंवा फोटो शेअर केलेला नाही. पण, त्यांच्या लग्नाची बातमी येताच, मुनव्वर आणि मेहजबीन यांची भेट कशी झाली, त्यांची प्रेमकहाणी कशी सुरू झाली आणि ते एकमेकांचे सोबती कसे झाले याची चर्चाही बरीच व्हायरल आहे.

या जोडप्याने त्यांच्या लग्न किंवा प्रेमकथेबाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. मेहजबीन कोतवाला ही एक मेकअप आर्टिस्ट आहे आणि तिचे हे दुसरे लग्न आहे, तर 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील अक्षरा म्हणजेच हिना खानने दोघांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हिना खानने मेहजबीनला मुनव्वरच्या मेकअपसाठी पाठवले होते आणि दोघांची ही पहिलीच भेट होती. असे म्हटले जात आहे की दोघेही दोन  महिन्यांपूर्वी एकमेकांना भेटले होते आणि एकमेकांना पसंत करू लागले होते. रिपोर्ट्सनुसार, त्यांचा विवाह २६ मे रोजी झाला होता.

कॅन्सरचं कारण ठरतोय रोजच्या आहारातील हा पांढरा पदार्थ; ICMR ने सांगितलं खायचं तर योग्य प्रमाण

हिना खान आणि मुनव्वर फारुकी  चांगले मित्र आहेत आणि त्यांनी एका म्युझिक व्हिडिओमध्येही एकत्र काम केले आहे. त्यांच्या लग्नाला आणि रिसेप्शनला काही निवडक लोकच उपस्थित होते, असे बोलले जात आहे. मुनव्वर यांच्या नावावर बिग बॉस 17  शोमध्ये त्याच्या लव्ह लाईफवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.

शिळं नको म्हणून उरलेली चपाती फेकता? शिळी चपाती खाण्याचे ५ फायदे; ताजं सोडून शिळं आधी खाल

मुनव्वर फारुकीची एक्स गर्लफ्रेंड आयशा खानने त्याच्यावर फसवणूक आणि डबल डेटिंगचा आरोप केला होता. याशिवाय त्याच्या लव्ह लाईफबाबतही अनेक खुलासे झाले होते. यानंतर अनेक लोक मुनव्वर फारुकीचे समर्थन करताना दिसले तर अनेकजण विरोध करताना दिसले.

टॅग्स :सोशल व्हायरल