Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या श्रेयाने जिंकले गोल्ड, भारताची गर्ल्स मॅथ ऑलिम्पियाड स्पर्धेत दमदार कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 09:12 IST

European Girls’ Mathematical Olympiad 2026 : भारताच्या चार सदस्यीय संघाने एकूण 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकत शानदार कामगिरी केली.

European Girls’ Mathematical Olympiad 2026 : भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ऐतिहासिक कामगिरी मुंबईतील श्रेया शंतनू मुंधडा हिने केली आहे. श्रेया ही European Girls’ Mathematical Olympiad 2026 (EGMO 2026) मध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय मुलगी ठरली आहे. ही स्पर्धा Bordeaux येथे आयोजित करण्यात आली होती. भारताच्या चार सदस्यीय संघाने एकूण 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक जिंकत शानदार कामगिरी केली. या कामगिरीमुळे भारताला 67 देशांमध्ये 6वा क्रमांक मिळाला, जो आतापर्यंतचा सर्वोत्तम आहे.

ही स्पर्धा भारतासाठी विशेष ठरली कारण भारताचा हा EGMO मधील सर्वोच्च टीम रँक आहे. भारताने या स्पर्धेत संघ पाठवण्याची ही केवळ दुसरी वेळ होती. Homi Bhabha Centre for Science Education (HBCSE-TIFR) ने याला “राष्ट्रीय अभिमानाचा क्षण” म्हटले आहे.

संघातील इतर सदस्यांची कामगिरीही उल्लेखनीय ठरली. केरळच्या संजना फिलो चॅकोला रौप्य पदक, तामिळनाडूच्या शिवानी भरत कुमार कांस्य पदक मिळाले तर कोलकात्याची श्रीमयी बेहरा संघाचा भाग होती. या संघाचे नेतृत्व डॉ. वैदेही थत्ते, डॉ. मृदुल थत्ते आणि निरीक्षक अदिती मुथखोड यांनी केले.

EGMO ही स्पर्धा 2012 मध्ये सुरू झाली असून, गणित क्षेत्रात मुलींचा सहभाग वाढवण्यासाठी ती आयोजित केली जाते. ही स्पर्धा International Mathematical Olympiad (IMO) प्रमाणेच अत्यंत कठीण मानली जाते आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याच्या कौशल्यांची कसोटी घेते. या वर्षी 67 देशांतील सुमारे 260 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. भारताची ही कामगिरी केवळ गणितातील प्रगती दाखवत नाही, तर STEM क्षेत्रात मुलींच्या वाढत्या सहभागाचेही मजबूत संकेत देते.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai's Shreya Wins Gold at Girls' Math Olympiad; India Shines

Web Summary : Mumbai's Shreya Mundhada won gold at the European Girls’ Mathematical Olympiad 2026, a first for India. The Indian team secured 1 gold, 1 silver, and 1 bronze, achieving 6th rank among 67 countries. This is India's best team ranking in EGMO, highlighting growing female participation in STEM.
टॅग्स :मुंबईआंतरराष्ट्रीयसोशल व्हायरल