Lokmat Sakhi >Social Viral > मुंबई लोकल: लेडीज डब्यात रोज एवढी भांडणं का होतात? का बायका इतक्या चिडतात..

मुंबई लोकल: लेडीज डब्यात रोज एवढी भांडणं का होतात? का बायका इतक्या चिडतात..

Mumbai Local And Ladies Compartment : महिलांच्या डब्यात नक्की काय चालू असतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2025 15:23 IST2025-01-17T15:17:22+5:302025-01-17T15:23:01+5:30

Mumbai Local And Ladies Compartment : महिलांच्या डब्यात नक्की काय चालू असतं?

Mumbai Local And Ladies Compartment | मुंबई लोकल: लेडीज डब्यात रोज एवढी भांडणं का होतात? का बायका इतक्या चिडतात..

मुंबई लोकल: लेडीज डब्यात रोज एवढी भांडणं का होतात? का बायका इतक्या चिडतात..

मुंबईची लाइफलाईन काय? अगदी बरोबर रेल्वे. लहानपणी रेल्वेने प्रवास करायला मज्जा वाटायची ना? आता त्याच रेल्वेला दोष देत रोज कामावर जायला लागतं.(Mumbai Local And Ladies Compartment ) इंग्रज एकच चांगली गोष्ट ठेवून गेले ती म्हणजे ही रेल्वे. विचार करा.. जर मुंबईत लोकल बंद झाली तर? अहो मग जगणं मुश्कीलच नाही तर, अशक्य होऊन जाईल.(Mumbai Local And Ladies Compartment ) असा हा रेल्वेचा प्रवास स्वस्त आणि मस्त. जो प्रवास आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. जो रोजच करावा लागतो. तो सुखाचा व्हावा असं वाटणं साहाजिकच आहे. वेळेत पोहचण्याच्या नादात माणुसकी तर मागे राहत चालली नाही ना? लेडिजच्या डब्यात 'आपलं ते सुख आणि तेरा तू देख'. असं व्हायला लागलं आहे का?      

जनरलाच्या डब्यात कधी भांडण झालं की पुरुष म्हणतात, "भांडायच असेल तर लेडीजच्या डब्यात चढा." हे ऐकल्यावर आपल्यातलं फेमिनिझम जागं होतं.(Mumbai Local And Ladies Compartment ) मात्र तो असं का बोलला हा विचार आपण करतो का? नाही करत तर तो करायला हवा. आता रोज कामावर जाणाऱ्या  महिलांची संख्या मोठी आहे. 'बाईने घरी बसावे' तो जमाना गेला. हल्लीच एका डब्यात भांडणादरम्यान महिलांनी मिळून, एका महिलेला तिच्या मुली समोर मारहाण केली.(Mumbai Local And Ladies Compartment )  एवढंच नाही तर त्या दोघींना बाहेर स्थानकावर ढकलून दिले. ही काय एकचं घटना नाही. अशा घटना घडतच असतात. केस ओढणं, मारहाण, शिवीगाळ हे तर रोजचंच आहे. पण आता हे कुठेतरी थांबायला हवं.

फक्त रेल्वेची वारंवारता कमी नाही आहे. तर आपल्यातील शिस्त व सामंजस्य देखील कमी आहे.आपल्याकडे 'बाईच बाईची शत्रू असते' वगैरे बोलायची पद्धत आहे. पण मग ती पद्धत सुरूच का झाली?  या पद्धती बदलण्याची जबाबदारी आपलीच. दोन पावले बाजूला सरकून, एखादीची मदत करणे नक्कीच फार अवघड नाही. गरोदर, वयस्कर महिलांना बसायला देणे पुंण्याचेच. लेडिज डबा आपल्याच घराच्या माजघरासारखा आहे. सर्वांनी मिळून मिसळून राहण्याची जागा. 'थोडा तेरा थोडा मेरा' असं वागून तर बघा. रोजची कटकट बंदच होऊन जाईल आणि लेडिज डबा आपलासा वाटायला लागेल.     

Web Title: Mumbai Local And Ladies Compartment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.