Join us

आई मुलांसाठी रक्त आटवते, पण ही आई मुलाचंच रक्त वापरणार, तरुण राहण्याचे वेड असे की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2025 14:35 IST

Mother Want's To Do Blood Transfusion By Using Son's Blood : तारूण्याच्या लालसेपोटी मुलाच्या रक्ताचा वापर करून तरूण दिसण्याचा निर्णय घेणारी आई होत आहे सोशल मिडियावर प्रचंड ट्रोल.

आईला देवासमान मानले जाते. एक आई तिच्या मुलांसाठी काहीही करू शकते याची अनेक उदाहरणे आहेत. बदलत्या जगात नात्यांचे स्वरूप व प्राधान्ये देखील बदलत चालली आहेत. एक अशीच विचित्र बातमी वृत्तांमधून समोर आली आहे. वार्ता लॉस एंजेल्स मधल्या स्वघोषित ह्यूमन बारबीची आहे .(Mother Want's To Do Blood Transfusion By Using Son's Blood ) 'मार्सेला' नामक एक ४७ वर्षीय महिला ब्लड ट्रांसफ्यूजनसाठी स्वतःच्या मुलाचे रक्त वापरणार आहे असे तिने मिडियाला सांगितले. मुलांसाठी रक्ताचे पाणी करणारी आई, मुलाच्या रक्ताचा वापर तारूण्य जपून ठेवण्यासाठी करु शकते? असा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे. या तिच्या निर्णयावर कोणाचाच विश्वासच बसत नाही आहे.(Mother Want's To Do Blood Transfusion By Using Son's Blood ) सोशल मिडियावर तिला आता प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. पण ती काहीही चुकीचे करत नसल्याचे ती सांगते. तिचा मुलगा रोड्रिगो स्वतःहून रक्त द्यायला तयार झाल्याचेही तिने सांगितले.  

ब्लड ट्रांसफ्यूजन म्हणजे काय?आत्ताच्या वैद्यानिक जमान्यात काहीही घडू शकते. सातत्याने अनेक नवनविन वैद्यकीय उपचारांचा शोध लागत आहे. ब्लड ट्रांसफ्यूजनमध्ये रक्तातील प्लाज्मा प्रोटीन, लाल रक्त पेशी, ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी नवे रक्त चढवले जाते.  यासाठी सुदृढ, मजबूत अशा तरूण व्यक्तीचे रक्त वापरले जाते. या चढवलेल्या रक्तामुळे प्राप्तकर्ता तरूण व टवटवीत राहतो. ही प्रक्रिया काही ४-५ तासांची असते.(Mother Want's To Do Blood Transfusion By Using Son's Blood ) एकंदरीत तरूण रक्तातील गुणधर्म मिळावेत म्हणून ही प्रक्रिया केली जाते.

मार्सेला स्वतःला बारबी म्हणवते. तिचे म्हणणे असे आहे की, तिचा मुलगा तिचा रक्तदाता बनण्यासाठी तयार आहे. त्याला हे काम करण्यात आनंद मिळत आहे. तरुण दिसण्यासाठी तिने आत्तापर्यंत करोडो रूपये खर्च केले आहेत. मार्सेलाने अनेक सर्जरीज करून घेतल्या आहेत. आता ती स्वतःच्या मुलाचे रक्त वापरणार आहे. तो त्याच्या आजीलासुद्धा रक्त द्यायला तयार असल्याचे तिने सांगितले.  सुंदर दिसण्यासाठी लोकं काहीही करू शकतात. पण एखादी आई असा विचारही करू शकते यावर विश्वास ठेवणे कठीणच आहे

टॅग्स :सोशल व्हायरलमाध्यमेरक्तपेढीव्हायरल फोटोज्