Join us

ख्रिसमस सुटीत घरी आल्यावर मुलांनी काय- काय करायचं, आईने केलं जबरदस्त प्लॅनिंग, बघा टाईमटेबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2022 17:23 IST

Viral Post Of Mother For Christmas Vacation: सुटीमध्ये मुलं घरी आली की मुलांसोबत कसा वेळ घालवायचा, याचं एका आईने केलेलं हे जबरदस्त प्लॅनिंग सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे...

ठळक मुद्दे एका आईने तिच्या मुलाला चक्क एक मेल केला असून त्यामध्ये सुटीतल्या कोणत्या दिवशी काय करायचं, याचं अगदी सविस्तर प्लॅनिंग सांगितलं आहे. 

शिक्षण, नोकरी या कारणांमुळे अनेक मुला- मुलींना घराबाहेर रहावं लागतं. वेळेअभावी मग महिनोंमहिने घरी चक्करही होत नाही. म्हणूनच मग दिवाळी, ईद, नाताळ (Christmas vacations) अशा मोठ्या सणांच्या निमित्ताने ही मुलं थोडा वेळ काढून निवांत घरी येतात. आता आधीच मोठा सण आणि त्यात सणासाठी मुलं घरी येणार म्हटल्यावर आईला होणारा आनंद तर विचारायलाच नको. मग ती जगभरातली कोणतीही आई असो.. तिची जय्यत तयारी सुरू होते. अशाच एका आईने सुरू केलेल्या तयारीची पोस्ट (Mother prepared detailed timetable for Christmas vacations) सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. 

आता नाताळ सण जवळ आला आहे. त्यासाठी खास बाजारपेठा सजायलाही सुरुवात झाली आहे. पुढच्या आठवड्यात शाळकरी विद्यार्थ्यांसकट अनेक जणांना चांगल्या ८ ते १० दिवसांच्या नाताळाच्या सुट्या आहेत.

अभिनेत्री भाग्यश्रीचं ब्यूटी सिक्रेट! त्वचा, केस आणि आरोग्य- तिन्हीसाठी एक खास उपाय

त्यामुळे अनेकांनी सण साजरा करण्यासाठी किंवा सुट्या आहेत त्यामुळे आपापल्या गावी जाण्याची तयारी केली आहे. सध्या व्हायरल झालेली पोस्टही यासारखीच आहे. @kmelkhat या ट्विटर हॅण्डलवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये एका आईने तिच्या मुलाला चक्क एक मेल केला असून त्यामध्ये सुटीतल्या कोणत्या दिवशी काय करायचं, याचं अगदी सविस्तर प्लॅनिंग सांगितलं आहे. 

 

ट्विटरवरून ही पोस्ट शेअर करणारी व्यक्ती म्हणतेय की आईचं दर सुट्टीचं काही ना काही प्लॅनिंग ठरलेलंच असतं आणि त्याचे मेल ती आम्हा सगळ्या भावंडांना सुटीच्या काही दिवस आधीच पाठवून ठेवते.

कोणत्या प्रकारच्या साडीवर कुठलं ब्लाऊज शोभून दिसतं? ब्लाऊजचे ४ प्रकार, निवडा परफेक्ट स्टाइल

त्यामुळे सुटीत आता काय करायचं हा प्रश्न आम्हाला कधीच पडत नाही. या प्लॅनिंगमध्ये त्या माऊलीने अगदी मुलांच्या आरामापासून ते कोणत्या दिवशी कोणता पदार्थ खायचा, घरातल्या महिलांनी पार्लरमध्ये कधी जायचं या सगळ्या गोष्टींचही अगदी अचूक प्लॅनिंग केलं आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियानाताळ