मातृदिन नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या दिवशी बहुतांश लोकांनी त्यांच्या आईविषयीच्या वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या. आईचे कोडकौतूक केले, आईला शुभेच्छा दिल्या.. हा दिवस सरला आणि पुन्हा आपलं रुटीन सुरू झालं.. मदर्स डे एक दिवसाचा असला तरी आई मात्र तिचं प्रेम असं एका दिवसापुरतं मर्यादित ठेवू शकत नाही. बारा महिने, २४ तास ती सतत आपल्या लेकरासाठी उभी राहू शकते, त्याची काळजी घेऊन त्याला अपार माया देऊ शकते.. मग ते करताना तिला स्वत:ला काही त्रास झाला तर प्रसंगी ती त्याकडेही दुर्लक्षच करते. अशीच एक माऊली आपल्या जावयासाठी अगदी ठामपणे उभी राहिली आणि त्याचे प्राण वाचविण्यासाठी झटली. सोशल मीडियावर सध्या म्हणूनच तर तिची खूप चर्चा होते आहे. बघा ती आई काेण आणि तिने जावयासाठी नेमकं काय केलं..(mother in law saves man with chronic kidney disorder)
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार नोएडा येथील एका ३७ वर्षीय तरुणाला क्रॉनिक किडनी डिसिज झाला होता. दोन वर्षांपुर्वी हा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्याने अनेक उपचारही घेतले. पण म्हणावा तसा फरक पडला नाही. तब्येत दिवसेंदिवस खराब होत होती.
आंबे खाऊन खरंच वजन वाढतं? तज्ज्ञ सांगतात 'या' पद्धतीने खा, आरोग्याला मिळतील भरपूर फायदे
त्यामुळे मग किडनी ट्रान्सप्लांटचा निर्णय घेणं गरजेचं होतं. त्याचे दोन्ही पालक ८० वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. त्यामुळे त्यांच्या किडन्या त्याला देता येत नव्हत्या. याशिवाय त्याची पत्नी गरोदर होती आणि भावाचा रक्तगट वेगळा असल्याने इच्छा असूनही त्या दोघांनाही किडनी देता आली नाही.
मुळव्याधीचा त्रास वाढला? रामदेव बाबा सांगतात उपाशीपोटी 'हा' पदार्थ खा, बरं वाटेल
अशावेळी त्याच्या पत्नीची आई म्हणजेच त्याची सासू त्याचा जीव वाचविण्यासाठी पुढे आली आणि तिने जावयासाठी तिची किडनी दिली. खरंतर त्यांचंही वय ५३ वर्षे होतं. पण तरीही या वयात होणारा त्रास सहन करून त्या लेक- जावयासाठी खंबीरपणे पुढे आल्या आणि जावयाचा जीव वाचवला.